
संगमेश्वर /प्रतिनिधी- देवरुख साखरपा रस्त्यावरती प्रचंड खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख यांच्याकडून सदर कामासंदर्भात खड्डे भरण्याची कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. सदर रस्त्याचे काम होऊन पाच वर्षे पूर्ण झालेले नसताना एवढे खड्डे पडावेत म्हणजे कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सदर रस्त्या संदर्भात स्थानिक प्रतिनिधी कोणती घेत नाहीत. संगमेश्वर ते बुरंबी दरम्यान सदरच्या रस्त्यावर प्रचंड खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. सदर रस्त्यावरून जाताना लोकांचे हाल होत आहेत परंतु प्रशासन निम्मे आहे कोणतेही खड्डे करण्याचे काम सदर ठिकाणी होत नाही.
नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत…
संगमेश्वर बुरंबी दरम्यान रस्त्याला प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत घेऊन लोक प्रवास करत आहेत. वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. प्रवासी ना इलाज झालं जास्त सदर रस्त्यावरून प्रवास करतात. अनेक अपघात होऊ नये खड्डे भरण्याचे काम होतं असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संगमेश्वर बुरंबी दरम्यान नवनिर्माण कॉलेज असल्याने विद्यार्थी ही सदर ठिकाणाहून चालत जातात गाड्यांचे मुळे खड्ड्यातील पाणी लोकांच्या अंगावर ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. सदर ठिकाणावरून मुले नवनिर्माण कॉलेजला चालत जातात. याचातरी विचार सार्वजनिक बांधकाम विभाग करणार की नाही प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकारी, लोक प्रतिनिधी सदर बाबीकडे दुर्लक्ष…
सदर रस्त्यावरून अधिकारी लोकप्रतिनिधी विविध पक्षातील पदाधिकारी प्रवास करतात. पावसाळा चालू झाल्यापासूनच सदर रस्त्यावर खड्डे आहेत. नागरिकाकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की सदर रस्त्यावर पडलेले खड्डे लोकप्रतिनिधींना दिसत नाहीत का ? अधिकाऱ्यांवर व लोकप्रतिनिधींवर कोणाचा दबाव आहे याचा खुलासा अधिकाऱ्याने करणे फार गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी चांगल्या गडातून प्रवास करायचा व मतदारांना वाऱ्यावर सोडायचे हे योग्य आहे का? याचा विचार नागरिकांनी करणे फार गरजेचे आहे.
कॉलेज आणि हायस्कूल ला जाणारे विद्यार्थी आणि संगमेश्वर पंचक्रोशी आणि परिसरातील जनतेची प्रचंड प्रचंड हाल….
संगमेश्वर मधील नवनिर्माण हायस्कूल आणि कॉलेज एक नावाजलेली शिक्षण संस्थेची कॉलेज लवले येथे आहेत . बुरंबी येथे दादासाहेब सरफरे विद्यालय आणि कॉलेज आहे . शैक्षणिक क्षेत्रामध्ये या दोन्ही संस्थांना प्रसिद्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातात. संगमेश्वर पंचक्रोशीतील विद्यार्थी सदर ठिकाणी शिक्षणासाठी जातात. संगमेश्वर तालुक्याचे देवरुख हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने तहसील कार्यालय,पंचायत समिती भूमि अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदी शासकीय कामांसाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. तालुक्याचे ठिकाणी न्यायालय असल्याने शिवाय संगमेश्वरपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर लोवले येथे नवनिर्माण ज्युनिअर आणि सीनिअर कॉलेज, पुढे बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय तसेच देवरुख येथील शाळा- कॉलेजसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ने – आण सुरू असते. त्यामुळे शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थ या सर्वांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. एका खड्ड्याला चुकवलं तरी दुसऱ्या खड्ड्यात वाहन जाण्याची शंभर टक्के शक्यता असते, इतकी बिकट परिस्थिती या मार्गावर निर्माण झाली आहे. सदर कट्ट्यांमुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येते आहे.


रुग्णांचे, गरोदर महिलांची आणि सर्वसामान्य नागरिकांना वेदना…
देवरुख साखरपा या राज्य मार्गावरून बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र, संगमेश्वर-देवरुख ग्रामीण रुग्णालये तसेच खासगी दवाखान्यांत रुग्णांना नेणे म्हणजे रुग्णांच्या हालात अधिकच भर पडणे होय. बसणाऱ्या सततच्या हादऱ्यांमुळे रुग्णांची वेदना वाढते. इतकेच नव्हे तर दर महिन्याला
तपासणीसाठी जाणाऱ्या गरोदर महिलांनाही या मार्गावरून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
“उपचार झाले नाही तरी चालतील, पण खड्ड्यांचे जीवघेणे हादरे नकोत ” अशी हतबल भावना
रुग्णजनतेतून व्यक्त होत आहे.
आम सभेमध्ये नागरिकांचा आमदारांना सवाल “आमदार साहेब, एकदा तरी एसटी बसने प्रवास करा”..
काही दिवसांपूर्वी झालेल्या संगमेश्वर तालुक्याच्या आमसभेत एका जागरूक नागरिकाने आमदार शेखर निकम यांच्यासमोर या रस्त्याची कैफियत मांडली.” एसटी बसने प्रवास करताना या खडडयांतन किती जीवघेणे हादरे बसतात हे हायफाय गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना जाणवत नाही. साहेब, तुम्ही एकदा तरी एसटी बसने प्रवास करून पाहा म्हणजे जनतेची खरी परिस्थिती समजेल,” असे स्पष्ट शब्दांत सुनावले.
संगमेश्वर बुरुंबी दरम्यान दुचाकी अपघातांची सुरूच…
संगमेश्वर बुरबी दरम्यान आणि संगमेश्वर साखरप्या दरम्यान खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज न
आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार अपघातांना बळी पडले आहेत. राज्यात व जिल्ह्यात यापूर्वी खड्ड्यांमुळे मृत्यूच्या घटनाही घडल्या असून काहींना कायमचे
अपंगत्व स्वीकारावे लागले आहे. त्यामुळे अशा दुर्घटना घडण्याआधीच संबंधित विभागाने केवळ नावापुरती मलमपट्टी न करता दर्जेदार पद्धतीने रस्ता दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी करण्यात येते आहे.
रस्ता झाल्यानंतर लगेचच पडले खड्डे, शासन निर्णयांचे तीन तेरा….
संगमेश्वर साखरपा महामार्ग कम होऊन अंदाजे पाच वर्षाचा कालावधी झाला आहे. रस्ता झाल्यानंतर दुसऱ्यावरचीच रस्त्याला खड्डे पडले. शासन निर्णयानुसार दोन वर्षाच्या आत खड्डे पडले तर सार्वजनिक बांधकाम विभागाने कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते परंतु कोणतीही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख यांच्याकडून करण्यात आलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यामध्ये प्रवाशांनी हाल काढायचे आणि कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. लोकप्रतिनिधींचा दबाव असल्यामुळे सदरचे कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होत नाही. सदरचा रस्ता हा 32 कोटी रुपयांचा असून रस्त्याचे काम करताना बेसिक काम हे झालेले नाही खालील बेसमेंट चे काम न केल्यामुळे सदरचे रस्त्यावर खड्डे पडत असल्याचे बोलले जात आहे. नदी ते मारलेश्वर रस्त्याचे काम राज्यामध्ये कौतुकाचे ठरत आहे. आजही सदर रस्त्यावरती खड्डे पडलेले नाहीत. तर त्याचवेळी मंजूर झालेला 32 कोटीच्या रस्त्यावरती खड्डे का पडले? याचा खुलासा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. पालकमंत्री यांनी सदर विषयांमध्ये जातीनिशी लक्ष घालून सदर रस्ता लवकरात लवकर करून देण्याची नागरिकांची मागणी आहे. सोशल मीडियावर सदर रस्त्याची चर्चा जोरदार चालू आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

