हजारो भाविकानी घेतले दर्शन
गणपतीपुळे प्रतिनिधी- गणपतीपुळेतील स्वयंभू श्री गजाननाच्या दर्शनासाठी आज गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक ग्रामस्थांसह भाविक पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे घरोघरी गणेशाची पार्थिव मूर्ती न आणता भाद्रपदी गणेशोत्सव स्वयंभू श्री गजाननाच्या मंदिरामध्ये साजरा केला जातो; आज भाद्रपदी गणेश चतुर्थी निमित्त येथे स्थानिक ग्रामस्थांना धुतल्या वस्त्रानी गाभाऱ्यामध्ये जाऊन स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन घेता येते.
▶️ट्विटर-
https://twitter.com/J_S_Dabav/status/1704184245869236612?t=5IB2iDZm1h_xbvRSlCLC0A&s=19
युट्युब-
https://youtu.be/SwmgjI-9qxY?si=c7R5GobooPr87nfs
आज पहाटे ५ वाजल्यापासून ‘श्रीं’ च्या स्पर्श दर्शनाची सुरुवात झाली पहाटे एक वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ दर्शन लाईन मध्ये उभे राहून श्री गणेशाच्या स्पर्श दर्शनाला हजेरी लावली होती लावली होती.
आज स्थानिक ग्रामस्थांसह घाट माथ्यावरून आलेल्या भक्त पर्यटकांनी स्पर्श दर्शनाचा लाभ घेतला सायंकाळी ४:३० वाजता हार फुलांनी सजवलेल्या पालखी मधून ‘श्रीं’ ची पालखी परिक्रमा काढण्यात येते. यावेळी गणपतीपुळे येथील स्थानिक ग्रामस्थांसह हजारो भाविक पर्यटक उपस्थित असतात.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालगुंड गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कार्तिकी पाटील; सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी तसेच पोलीस कॉन्स्टेबल कुणाल पाटील; श्री गुरव; होमगार्ड श्री धावडे; सुरज जाधव आदींकडून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे तसेच आलेले भाविक व पर्यटक समुद्रामध्ये समुद्र स्नानासाठी जातात त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीकडून ‘जीव रक्षक’ समुद्राच्या किना-यावर तैनात करण्यात आले आहे.