कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशी भविष्य 10 ते 16 मार्च…

Spread the love

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

▪️मेष (Aries) Weekly Horoscope :

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. जी व्यक्ती आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांची नोकरीत प्रगती होईल. नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येऊ शकते. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. प्रणयी जीवनात गैरसमजामुळं तणाव असल्याचं दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुद्धा एखाद्या गोष्टीमुळं वाद संभवतो. विद्यार्थी एकाग्रतेनं आपलं अध्ययन करून यशस्वी होतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपली आर्थिक स्थिती भक्कम राहील. खर्च जास्त होतील. शेअर्स बाजारात गुतंवणूक करू शकता. आपण जर एखादी जमीन किंवा वास्तू घेऊ इच्छित असाल तर ती या आठवड्यात घेऊ शकता. प्रकृतीकडं आपणास लक्ष द्यावं लागेल. घरात मंगल कार्याचं आयोजन होईल.

▪️वृषभ (Taurus) :

हा आठवडा आर्थिक बाबतीत अत्यंत अनुकूल आहे. नोकरीत आपली प्रगती होईल. नवीन नोकरीत रुजू होण्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. व्यवसायात प्रगती साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. मात्र, त्यासाठी आपणास आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. आपलं प्रणयी जीवन सुखावह असले तरी एखाद्या अन्य व्यक्तीमुळं आपल्यात कटुता निर्माण होऊ शकतो. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना मेहनत वाढवावी लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. ऋतू बदलामुळं प्रकृतीत चढ – उतार होत असल्याचं दिसून येईल. भावंडांच्या शिक्षणासाठी आपण परिचितांशी बोलणी कराल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल.

▪️मिथुन (Gemini) :

हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. आपल्या मनातील विचार प्रेमिके जवळ व्यक्त करू शकता. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येऊ शकते. नोकरी आणि व्यवसाया निमित्त प्रवास करावं लागण्याची शक्यता सुद्धा आहे. हे प्रवास आपल्यासाठी लाभदायी ठरतील. नवीन लोकांशी ओळख होईल. नवीन संपर्क होतील. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी भरपूर पैसे खर्च कराल. जमीन खरेदी करण्याची इच्छा असल्यास आपण ती या आठवड्यात घेऊ शकता. शेअर्स बाजारात सुद्धा गुंतवणूक करू शकता. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्यानं त्यांचं लक्ष अध्ययनात लागणार नाही.

▪️कर्क (Cancer) :

हा आठवडा आपल्यासाठी आनंदानं भरलेला आहे. विवाहित व्यक्ती जोडीदाराशी असलेले जुने मतभेद दूर करून पुढे जातील. आपले प्रणयी जीवन सुखावह होईल. विवाहेच्छुकांना मनाजोगा जोडीदार मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. जे मित्र आपला वेळ वाया घालवत असतील त्यांच्या पासून मात्र आपणास दूर राहावं लागेल. जे विद्यार्थी स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांनी आपली मेहनत वाढवली तरच ते त्यात यशस्वी होतील. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण आनंदानं आपलं सर्व खर्च कराल. शेअर्स बाजारात सुद्धा गुंतवणूक करू शकता. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचं आयोजन कराल. प्रकृतीत हळू हळू सुधारणा होईल. प्रवास केल्यानं आपणास थकवा जाणवेल. जर आपले एखादे सरकारी काम प्रलंबित असेल तर ते सुद्धा पूर्ण होईल.

▪️सिंह (Leo) :

या आठवड्यात आपणास आपल्या नात्यात प्रेम आणि समन्वय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रणयी जीवनात खूपच सावध राहावं लागेल. एकमेकांच्या सहवासात वेळ घालविणं आपल्यासाठी हितावह ठरेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. प्रकृतीत हळू हळू सुधारणा होईल. या आठवड्यात आपण स्वतःसाठी एखादे वाहन खरेदी करू शकता. दीर्घकाळासाठी शेअर्स बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा कष्ट आणि संघर्ष करण्याचा आहे. आपलं परिश्रम यशस्वी होतील. व्यापारी वर्गास अचानकपणे एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. त्यामुळं आपणास लाभ प्राप्ती होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजनांचे सहकार्य मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत ते त्यात यशस्वी होतील.

▪️कन्या (Virgo) :

हा आठवडा आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणारा आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. ज्या काही समस्या होत्या त्या आता संपुष्टात येतील. आपलं प्रणयी जीवन सुखद होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. आपण एखादा नवीन शोध लावण्याचा विचार करू शकता. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. आपण व्यापारासाठी घरा पासून दूर सुद्धा जाऊ शकता. आपणास नव – नवीन संधी मिळाल्यानं आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपली प्रकृती पूर्वीच्या मानाने चांगली होईल. असं असलं तरी आपण आपली नियमित तपासणी करून घेणं हितावह होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपण आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी खूप पैसा खर्च कराल. आपणास जर आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती दीर्घकाळासाठी केल्यास हितकारक होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

▪️तूळ (Libra) :

या आठवड्यात आपणास कुटुंबियांचं सहकार्य लाभेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवून एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. त्यामुळं सर्वजण अत्यंत खुश होतील. आपल्या वैवाहिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं कटुता निर्माण होण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनात सुद्धा चढ – उतार होत असल्याचं जाणवेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी एखाद्या विषयात जागरूकता दाखवतील. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायात आपल्या स्तंभीत झालेल्या योजना पुन्हा सुरु करण्यात आपण यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. चालू नोकरीत सुद्धा नवीन काही शिकण्याची संधी मिळेल. आपण जमीन किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे.

▪️वृश्चिक (Scorpio) :

हा आठवडा आपल्यासाठी पूर्वीपेक्षा चांगला आहे. विवाहेच्छुकांना त्यांच्या पसंतीचा जोडीदार मिळेल. प्रणयी जीवन सुखद होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. जोडीदारास कार्यात यश प्राप्त होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपणास जर एखादी जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदारामुळं सुद्धा आपणास धनलाभ होण्याची संभावना आहे. शेअर्स बाजारासाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळेल. जर आपले एखादे सरकारी काम खोळंबले असेल तर ते सुद्धा पूर्णत्वास जाईल. नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येईल. विद्यार्थी त्यांच्या मित्रांच्या सहवासात वेळ घालवाल, त्यामुळं अभ्यासात त्यांचं नुकसान होईल. प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली राहिली तरी ऋतू बदलामुळं त्यात चढ – उतार होत असल्याचं दिसू शकते.

▪️धनु (Sagittarius) :

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत रोमँटिक असणार आहे. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. त्यांच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाल. जोडीदाराकडून एखादी चांगली भेटवस्तू सुद्धा मिळेल. घरात एखाद्या नवीन पाहुण्याचं आगमन होईल. विवाहेच्छुकांसाठी चांगले स्थळ येईल. या आठवड्यात आपण आपला पैसा वायफळ खर्चांसाठी सुद्धा वापरु शकता. शेअर्स बाजारात जास्त गुंतवणूक करू नका. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी मेहनत करण्याचा आहे. नवीन कंत्राट मिळेल. नोकरीत बदल करण्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. कला, डिझाईनिंग, मार्केटिंग इत्यादी काम करणाऱ्यांना चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्यानं अभ्यासात लक्ष लागणार नाही. ऋतू बदलामुळं प्रकृतीत चढ – उतार होत असल्याचं दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. आपणास आपल्या आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल.

▪️मकर (Capricorn) :

मकर या आठवड्यात आपणास नशिबाची साथ मिळेल. आपलं परदेशाशी सुद्धा नवीन संपर्क होतील. आपण आपल्या व्यापारास पुढे घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. आपणास जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदारासह रोमँटिक रात्री भोजनास जाल किंवा प्रेमळ वार्तालाप कराल. आपले प्रणयी जीवन सुखद असेल. आपण जर शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती खूप विचारपूर्वक करावी. हा आठवडा कर्ज देण्यास किंवा घेण्यास अनुकूल आहे. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी होतील. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. स्वतःसाठी एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी होऊ शकतात.

▪️कुंभ (Aquarius) :

हा आठवडा आपल्यासाठी विशेष असा असणार आहे. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. वैवाहिक जीवनात अहंकार बाजूस ठेवलात तर कोणत्याही प्रकारे कटुता येणार नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहील. ऑनलाईन प्राप्तीची साधने सुद्धा उपलब्ध होतील. आपण आपला थोडा वेळ धार्मिक कार्यास सुद्धा द्याल. शेअर्स बाजारात गुंतवणूक विचारपूर्वक करावी. आपण जर नोकरीत बदल करू इच्छित असाल तर आपल्या सध्याच्या नोकरीत सुद्धा चांगली संधी मिळेल. घरात भजन – कीर्तनाचं आयोजन होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारास एखाद्या नवीन कामाची सुरूवात करून देऊ शकाल. मुलांच्या उत्तर दायित्वाची पूर्तता होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. प्रकृतीत पूर्वी पेक्षा चांगली सुधारणा होईल. घर सजावटीसाठी आपण काही खरेदी करू शकाल. सर्व खर्चाचे अंदाजपत्रक बनविल्यास ते आपल्या हिताचं होईल.

▪️मीन (Pisces) :

हा आठवडा आपल्यासाठी पूर्वी पेक्षा चांगला आहे. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ घालवाल. सर्व जण मिळून एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचं आयोजन कराल. आपली प्रकृती पूर्वीच्या मानानं चांगली राहील. बाहेरील पदार्थ खाणं टाळावं. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापाऱ्यांना नव – नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. जे आपल्या घरापासून दूर राहून नोकरी करतात ते आपल्या कुटुंबाच्या आठवणीनं त्रस्त होऊ शकतात. विवाहेच्छुकांसाठी चांगलं स्थळ येईल. आपण घर दुरुस्तीसाठी सुद्धा भरपूर पैसा खर्च कराल. आपला काही वेळ धार्मिक कार्यक्रमात व्यतीत कराल. त्यामुळं आपणास मनःशांती मिळेल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page