आमदार टिळेकर यांच्या मामाची हत्या कशी झाली! वाचा पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या कटाची संपूर्ण अपडेट…

Spread the love

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी मोठा उलगडा झाला आहे. आरोपींनी ही हत्या नेमकी कशी केली, हे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

पुणे प्रतिनिधी – पुण्यात सोमवारी खळबळजनक घटना समोर आली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ याचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असून ही हत्या अत्यंत नियोजितपणे केल्याचं पुढं आलं आहे. ही हत्या नेमकी कशी झाली या बाबत देखील पोलिसांनी महत्वाची अपडेट दिली आहे.

कशी झाली हत्या ?…

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी ६.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपींनी त्यांना मांजरी येथून कारमध्ये बसवून त्यांना यवत परिसरात नेले. या ठिकाणी त्यांचा आरोपींनी लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून कानरयात आला, तसेच त्यांचा मृतदेह हा त्याच ठिकाणी फेकून देण्यात आला. यवत गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह दिसल्यावर त्यांच्या मृतदेहाशेजारी लाकडी दांडका पोलिसांना सापडला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यु नक्की कशाने झाला आहे हे समजेल अशी माहिती, पोलीस उपायुक्त ए राजा यांनी दिली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हडपसर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने वाघ यांचा शोध घेण्यासाठी सकाळी ९ वाजता पथक तयार करत ते रवाना केले होते. तपास पथकाने सीसीटीव्ही व टॅावर लोकेशनच्या मदतीने तपास सुरू केला. दरम्यान, १२ वाजता पोलिस आयुक्त ए. राजा हे स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. संध्याकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही लोकांना वाघ यांचा मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती यवत पोलीसांना दिली. पोलिसांनी वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटातून ताब्यात घेत ससुन रुग्णालयात शवविच्छेदणासाठी पाठवला आहे. त्यांच्या डोक्यावर काही तरी कठीण वस्तूने मारहाण करून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोण आहेत सतीश वाघ ?…

सतीश वाघ हे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. सतीश वाघ रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव आहे. या सोबतच ते प्रगतिशील शेतकरी देखील आहेत. त्यांची मांजरी – फुरसुंगी रस्त्यावर हॉटेल आणि दुकाने भाड्याने घेतली होती. तर ते मांजरी परिसरात वास्तव्यास होते. दरम्यान सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराच्या नातेवाईकांचे पुण्यातून अपहरण करून खून केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page