पुणे,: MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि वन विभागात रुजू झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला होता. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. दर्शना आपल्या मित्रासोबत 12 जून रोजी राजगडावर गेली होती. याच दिवशी ती शेवटचं तिच्या बाबांशी बोलली. त्यानंतर तिचा कोणाशीच संपर्क झाला नाही.
9 जूनला आली होती पुण्यात
तिचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी तक्रार केली होती, शेवटी 18 जून रोजी राजगडावर तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत तरुणीचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना ही 9 जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत (आरएफओ) विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने आमचे फोन उचलले नाहीत म्हणून मी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याच्या बरोबर सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेली असल्याचे कळाले, अशी माहिती दर्शनाच्या वडिलांनी दिली.