मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था,चहुकडे या हायवेवर खड्डे पडले, गणराया मी येऊ कसे ?…

Spread the love

मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असताना, मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. कारण ठरतोय मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांचा जीवघेणा प्रवास. याच पार्श्वभूमीवर, ‘चहुकडे या हायवेवर खड्डे पडले, गणराया मी येऊ कसे?’ असा आर्त सवाल करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
     

गणेशोत्सवाला आपल्या गावी जाण्याची ओढ प्रत्येक कोकणी माणसाला असते. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था या आनंदात विरजण घालत आहे. याच त्रासाला कंटाळून कोकणातील काही कलाप्रेमींनी एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये महामार्गावरील मोठमोठे खड्डे आणि वाहतूक कोंडीचे भयाण वास्तव दाखवण्यात आले आहे. कोकणी भाषेतून देवालाच साकडे घालणारा, “गणराया, तुझ्या दर्शनाला यायचे आहे, पण जिकडे तिकडे चहुकडे या हायवेवर खड्डे पडले येऊ कसे?” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. कोकणातील प्रत्येक चाकरमानी या व्हिडिओद्वारे आपल्या भावना व्यक्त करत असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणावर तीव्र संताप व्यक्त करत आहे.


      

गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना मुंबईत सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मंडपात आगमन होऊ लागले आहे. रविवारी अनेक मोठ्या गणरायांचे आगमन वाजत-गाजत झाले. यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात या गणरायांची मिरवणूक काढण्यात आली. आता चाकरमान्यांनाही कोकणातील घराची ओढ लागली आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाची बिकट अवस्था केवळ चाकरमान्यांसाठीच नव्हे, तर कोकणातील स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटकांसाठीही मोठी डोकेदुखी ठरली आहे. सणासुदीच्या काळात गावाकडची ओढ लागलेल्या माणसाला हा खडतर प्रवास नकोसा वाटू लागला आहे.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page