
पुणे- पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीने ५ ते ६ गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर चारजण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
तीव्र उतारावर हा अपघात झाला आहे. मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
अपघाताचे काही फोटो देखील समोर आले आहेत. फोटोंवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की ही धडकी किती जोरदार होती. अनेक गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. एक रिक्षा उलटली आहे. तर फुटपाथवरील काही दुकानांचंही नुकसान झालं असल्याची माहिती मिळत आहे.