रत्नागिरी हातखंबा येथे भीषण अपघात; आरामबसची ७ वाहनांना धडक , ४ जखमी…

Spread the love

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळील उतारात गतिरोधकानजिक एका खासगी आराम बसने ७ वाहनांना धडक दिली . हा अपघात रविवारी सकाळी झाला . त्यात चौघे जखमी झाले आहेत .

    ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले . अपघातात बसचालक काशिफ खान ( ४७ , रा . मध्य प्रदेश ) , जितेंद्र कुमार चौगुले ( रा . इचलकरंजी ) हे गंभीर जखमी झाले आहेत . तसेच सगीर जमील अन्सारी ( ३३ , रा . कोकणनगर , रत्नागिरी , महेश घोरपडे ( रा .

इचलकरंजी ) हे दोघे किरकोळ जखमी आहेत . कोल्हापूरहून खासगी आराम बस ( एमपी ४५ पी १६२६ ) रविवारी सकाळी रत्नागिरीकडे येत होती . हातखंबा येथे उतारावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले . त्यानंतर बसची दोन कार व पाच दुचाकींना जोरदार धडक बसली .

    आराम बसने दुचाकी ( एमएच १० एएम ९ ०१० ) , इनोव्हा कार ( एमएच ४६ एपी ४२४३ ) , स्विफ्ट कार ( एमएच २४ एएच ७४८ ) , दुचाकी ( एमएच ०९ ईव्ही ५५ ९ ६ ) , ॲक्टिवा ( एमएच ०८ ५५८ ९ ] , दुचाकी ( एमएच ०८ एवाय ४८३७ ) सह अन्य एका दुचाकीला धडक दिली . त्यानंतर बस एका बँकेच्या जुन्या इमारतीवर आदळली .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page