रविवार | दि. २९ जानेवारी २०२३.
▪️ मेष: जीवनात सुख समृद्धीचा योगायोग येईल आणि परस्पर प्रेम दृढ होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा निर्णयही घेऊ शकता. जर तुम्ही कोणता व्यवसाय भागीदारीत करत असाल तर कामाच्या ठिकाणी तुमची एखादी कल्पनाही पुढे येऊ शकेल तसेच ती स्वीकारली जाईल. आज या राशीसाठी जांभळा आणि पांढरा रंग शुभ असेल.
▪️ वृषभ: प्रवासाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी चांगला आहे. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर कदाचित तुमच्या एखाद्या रिसोर्सबद्दल तात्पुरती समस्या उद्भवू शकते. या राशीच्या लोकासांठी पिवळा आणि केशरी रंग शुभ आहे.
▪️ मिथुन: या राशीतील जे काही लोक राजकारणात असतील त्यांच्यासाठी आजचा दिवस लाभ देणारा असेल. मन प्रसन्न राहील आणि प्रेम जीवन रोमँटिक राहील. आज या राशीच्या लोकांसाठी पिवळा आणि पांढरा रंग शुभ आहे.
▪️ कर्क: या राशीतील जे लोक अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादी भूमिका मिळू शकते किंवा एखादी ऑडिशन पास होऊ शकाल. तुमचं नशीब फळफळणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. नारंगी आणि पिवळा रंग शुभ आहे.
▪️ सिंह: सर्वच दिवस काळजीपूर्वक हाताळावे लागतील.जिभेवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात चढउतार राहणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे टाळा. कामातील काही गोष्टींकडे गांभीर्यानं पाहा. आज या राशीसाठी लाल आणि हिरवा रंग शुभ आहे.
▪️ कन्या: नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. कन्या राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात काही अडचणी येऊ शकतात. सर्व दिवसांचा कालावधी सुखकर कसा जाईल ते पाहा. अडचणींवर मात करून पुढे जावे लागेल. आज या राशीच्या लोकांसाठी निळा आणि नारंगी रंग शुभ असेल.
▪️ तुळ: व्यवसायात चढउतार राहणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नये. आईच्या सल्ल्याचे पालन करा. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा. या राशीसाठी आज हिरवा आणि आकाशी रंग शुभ असेल.
▪️ वृश्चिक: नोकरी व्यवसायात बदल करू नका. जुने मित्र भेटतील. नोकरदार वर्गाला महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल.आर्थिकदृष्टया बचत करणे इष्ट राहील. आज या राशीसाठी गुलाबी आणि केसरी रंग शुभ असेल.
▪️ धनु: या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ आहे. कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल. कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाची भावना असेल. या राशीसाठी निळा आणि लाल रंग शुभ असेल.
▪️ मकर: या राशीतील काही लोकांचा प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या राशीसाठी पिवळा आणि गुलाबी रंग शुभ असेल.
▪️ कुंभ: या राशीतील काही लोक आपल्या जोडीदारासोबत खरेदीच्या मूडमध्ये घराच्या सजावटीसाठी जाऊ शकतात. त्यांचे परस्पर प्रेम अधिक दृढ होईल.
▪️ मीन: राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंधातील अस्वस्थता वाढत असल्याचे दिसते आणि परस्परांमधील अंतरही वाढू शकते. मानसिक आरोग्य आणि स्थैर्य हे सध्या तुमच्यासाठी सगळ्यात जास्त काळजीचे विषय आहेत. उधारी वसूल होईल. आज या राशीसाठी निळा आणि पांढरा रंग शुभ आहे.