शनिवार दि. जानेवारी २८, २०२३.
▪️ मेष: आरोग्याची काळजी घ्या. मित्र, नातेवाईकांसोबत भेटीगाठी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. पिवळ्या फळांचे दान करा. शुभ रंग – लाल आणि पांढरा.
▪️ वृषभ: नियोजनातून प्रगती साधू शकाल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. ओळखीतल्यांची साथ लाभेल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – गुलाबी
▪️ मिथुन: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. मनावर नियंत्रण ठेवा. समाजात मान-सन्मान मिळेल. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. शुभ रंग – निळा आणि हिरवा.
▪️ कर्क: राजकीय क्षेत्रात यश मिळेल. कामात आणि व्यवसायात यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मूग दान करा. नोकरी बदलण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. शुभ रंग – निळा.
▪️ सिंह: आज बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने आरोग्य खराब होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांबरोबर वाद होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – पांढरा.
▪️ कन्या: बुध आणि शुक्राचे संक्रमण तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देईल. वडिलांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. धार्मिक तीर्थयात्रा करू शकाल. शुभ रंग – पांढरा आणि जांभळा.
▪️ तूळ: गोड बोलणे, माणसं जोडणे आणि जपणे हिताचे हे लक्षात ठेवाल तर प्रगती कराल. शुभ रंग – नारंगी.
▪️ वृश्चिक: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायातील कामात यशप्राप्ती होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. शुभ रंग – पांढरा आणि पिवळा.
▪️ धनु: व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता. शुभ रंग – हिरवा आणि निळा.
▪️ मकर: नोकरीतील बदलाबद्दल तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात संघर्षाची चिन्हे आहेत. आर्थिक प्रगती होईल. गुळाचे दान करा. शुभ रंग – जांभळा आणि नारंगी.
▪️ कुंभ: नोकरीत प्रगतीबद्दल आनंद असेल. विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर समाधानी राहतील. आर्थिक सुखासाठी श्री सूक्ताचे पाठ करा. मित्रांचा पाठिंबा मिळाल्याने रखडलेले काम मार्गी लागेल. पिवळ्या फळांचे दान करा. शुभ रंग – आकाशी आणि हिरवा.
▪️ मीन: वायफळ खर्च करणं टाळा. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना कार्यात यश येईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकाल. शुभ रंग – पिवळा आणि निळा.