
संगमेश्वर:-संगमेश्वर येथील नाभिक समाजाचे कार्यकर्ते श्री दिनेश हरिभाऊ अंब्रे (रा.नावडी) यांना नुकताच गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला.
श्री दिनेश अंब्रे हे वरिष्ठ पत्रकार असून विविध पदांवर कार्यरत आहेत आत्तापर्यंत त्यांनी प्रपंच व परिवार सांभाळून समाजसेवा विविध क्षेत्रात व उल्लेखनीय केली आहे. आजपर्यंत त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत केंद्र शाळा संगमेश्वर नं 2 व पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे हा पुरस्कार प्राप्त झाल्याच्या निमित्ताने पैसा पण हायस्कूलमध्ये शिक्षण प्राप्त केलेल्या 1987 च्या बॅचच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या मित्राचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व अनेक भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान केला.

त्यामध्ये नावडीच्या सरपंच सौ. प्रज्ञा कोळवणकर (शेट्ये) श्री. गणेश शिंदे (पर्यवेक्षक) अजय शिंदे संतोष अंब्रे व्यापारी संतोष रहाटे शिक्षका रत्नप्रभा शेरे आधी उपस्थित होते माबळे येथील गणेश कृपा हॉटेलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला
