
*संगमेश्वर : दिनेश अंब्रे-* नावडी एसटी स्टँड समोरील गणेशोत्सव निमित्त उभारलेल्या रत्नागिरी जिल्हा प्रशासन अंतर्गत नागरी सुविधा केंद्रातील गणेश भक्तांच्या सेवेत तत्पर असलेले पोलीस अधिकारी उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव, ट्रॅफिक पोलीस श्री. रामपुरे, कुर्बान खतीब, आव्हाड, ट्रॅफिक पोलीस रियाज मुजावर, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, तलाठी तसेच कृषी विभाग कर्मचारी, ट्रॅफिक पोलीस अधिकारी, होमगार्ड आदींचे संगमेश्वर येथील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर, प्रमोद शेट्ये, राजेंद्र बिर्जे, माजी सरपंच नम्रता शेट्ये, नितीन शेट्ये, चंद्रकांत गावडे (तेरे) आदींनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.



श्री. प्रमोद शेट्ये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण तसेच पोलीस अधिकारी ट्रॅफिक पोलीस व नागरी सुविधा केंद्रात कोकणातील येणाऱ्या गणेश भक्तांच्या सेवेत तत्पर असलेल्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशंसा व्यक्त केली.
अमृता ग्रुप व सुरक्षा कमिटी सदस्य सौ. अर्चिता राहुल कोकाटे, डॉक्टर जोग मॅडम, नसरीन मोडक मॅडम यांनी पोलीस ठाणे येथे जाऊन संगमेश्वर पो.ठाणे परिसरात शांतता व सुव्यवस्था राखणारी पोलीस प्रशासन महिला पोलीस तांबडे मॅडम, वर्षा राणी कोष्टी, योगिता बरगाळे, क्रांती सावंत, पोलीस सहाय्यक अधिकारी तसेच महिला होमगार्ड कामिनी पडवळ व संबंधित पोलीस यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या मौलिक कार्याची अर्चिता कोकाटे यांनी प्रशंसा केली.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*