माननीय नितीन जी गडकरी केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे कामाची केली पाहणी !!!…..

Spread the love

🔯माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आज पळस्पे ते गाव जिल्हा रायगड  येथे ४१४.६८ कोटी रुपये किंमतीच्या व ६३.९०० किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे माननीय गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन !!!…….

⏩पनवेल – महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती करत असताना आज पळस्पे गाव, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथे ४१४.६८ कोटी रुपये किंमतीच्या व ६३.९०० किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री श्री उदय सामंत जी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण जी, खासदार श्री सुनील तटकरे जी, खासदार श्री श्रीरंग बारणे जी, तसेच सर्व आमदार, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले.

⏩छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याला लाभलेल्या जेएनपीटी व दिघी या दोन समुद्री बंदरांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. हे प्रकल्प स्थानिक तसेच राष्ट्रीय विकासात भरीव योगदान देत आहेत. समुद्री व्यापार, पर्यटन व औद्योगिक क्षेत्राची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती आणि ही प्रगती साध्य होऊ शकते ते मजबूत रस्त्यांच्या जोडणीतून. पनवेल ते कासू या महामार्गाच्या काँक्रिटीकरणामुळे प्रवास गतीमान होईल तसेच वेळेची व इंधनाची बचत होईल. वाहन चालवण्याच्या व देखभालीच्या खर्चात कपात होईल. जेएनपीटी व दिघी या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा हा मार्ग असल्याने यामुळे जल वाहतूक विकासाला चालना मिळेल.

⏩मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ हा कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असल्याने औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. तसेच कृषी, फलोत्पादन वाहतूक सुलभ होऊन व्यवसायाला चालना मिळेल. सुधारित रस्ता सुरक्षा प्रणालीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. हे प्रकल्प जिल्ह्याच्या, राज्याच्याच नाही तर देशाच्या व्यापारवृद्धीत व सर्वसमावेशक प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलतील.

⏩या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज १५ हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये 🔸कळंबोली जंक्शन हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि

🔸मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा १३,००० कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल.

⏩आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे गडकरी यांनी सांगितले.

#PragatiKaHighway #Gatishakti

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page