हॉकी विश्वचषक 2023: जर्मनीने अंतिम फेरीत केला बेल्जियमचा पराभव, तिसऱ्यांदा जिंकला हॉकी विश्वचषक

Spread the love

हॉकी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बेल्जियमचा पराभव करून जर्मनीने विजेतेपद पटकावले. यासह जर्मनीने बेल्जियमचे गेल्या पाच वर्षांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आणले. दोन गोलच्या पिछाडीतून जर्मनीने पुन्हा एकदा शानदार पुनरागमन केले. भारताने रविवारी गतविजेत्या बेल्जियमचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून, तिसऱ्यांदा FIH पुरुष हॉकी विश्व विजेतेपद पटकावले आहे.

रोमहर्षक फायनलमध्ये, दोन्ही संघ नियमित वेळेनंतर ३-३ ने बरोबरीत होते. परंतु जर्मनीने खचाखच भरलेल्या कलिंगा स्टेडियमसमोर सडन डेथमध्ये ५-४ असा विजय मिळवला. जर्मनीकडून निक्लस वेलेन (२९वे), गोन्झालो पेइलाट (४१वे) आणि कर्णधार मॅट्स ग्रेम्बुश (४८वे) यांनी नियमित वेळेत गोल केले.

गतविजेत्या बेल्जियमसाठी फ्लोरेंट व्हॅन ओबेल (10वे मिनिट), टेंगास कोसिन्स (11वे मिनिट) आणि टॉम बून (59वे) यांनी गोल केले. चालू स्पर्धेत जर्मनीने ०-२ अशी पिछाडीवर येण्याची ही तिसरी वेळ आहे, जी संघाच्या मानसिक बळाचा पुरावा आहे. जर्मनीने याआधी इंग्लंडविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची उपांत्य फेरी दोन गोलने खाली आल्यावर जिंकली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page