मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागूनच असलेला हिमालय पूलाच्या पुनर्बांधणीचे काम अखेर पूर्ण झाले असून आजपासून हा पुल रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. पुलाची तपासणी आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० मार्चपासून हिमालय पूल प्रवाशांसाठी व नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
मुंबईत पोलादापासून तयार करण्यात येणारा हा पहिलाच पूल ठरणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे ५० हजार पादचाऱ्यांना लाभ होणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी सात कोटी रुपये खर्च आला असून पुलाची लांबी ३३ मीटर आणि रुंदी ४.४ मीटर आहे. पुलाकडे सरकता जिनाही बसविला जाणार आहे. मात्र, तूर्तास नागरिकांना पुलांसाठी साध्या जिन्याचा मार्ग वापरता येणार आहे. येत्या सहा महिन्यात सरकते जिने नागरिकांसाठी खुले करण्यात येतील.