
जेरूसलेम- हिजबुल्लाह आणि इस्रायलमधील तणाव वाढला असून अधिकृत युद्धाची घोषणा झाली आहे. इस्रायलने हिजबुल्लाहवर हल्ला केला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून आज रविवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. रॉकेट, क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हा हल्ला करण्यात आला आहे. हिजबुल्लाहने आज रविवारी उत्तर इस्रायलमध्ये १०० हून अधिक रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागले आहेत. या हल्ल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला पाहायला मिळाला. लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. या हल्ल्याला हिजबुल्लाहचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पलटवार म्हंटलं जात आहे.
इस्रायली संरक्षण दलाने याबाबतची अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, हिजबुल्लाह सतत आमच्या लोकांना लक्ष्य करत आहे. रविवारी सकाळी जेझरेल खोऱ्यात 140 हून अधिक रॉकेट आणि ड्रोन हल्ला करण्यात आला. यानंतर हैफा, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अनेक लष्करी तळांजवळ अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिजबुल्लाह दहशतवादी आमच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. तर IDF ने X वर लिहिले आहे की, हजारो इस्रायलींनी बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये लपून रात्री काढल्या आहेत. त्यांच्या डोक्यावरून रॉकेटचा वर्षाव होत होता.रात्रभर रॉकेट अलर्ट सायरन वाजत राहिले .
इस्त्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहकडून सतत इस्रायलविरोधात हल्ले केले जात आहेत. रविवारी सकाळी जेझरील खोऱ्यात 140 हून अधिक रॉकेट आणि ड्रोन डागण्यात आले. यानंतर हैफा, नाझरेथ, अफुला, लोअर गॅलीलीसह अनेक लष्करी तळांजवळ अलर्ट जारी करण्यात आला. IDF ने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहचे दहशतवादी सतत आमच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. यामुळे हजारो इस्त्रालयींना जीव मुठीत घेऊन शेल्टरमध्ये रात्र काढावी लागली. त्यांच्या डोक्यावरुन सतत रॉकेटचा वर्षाव होत होता. काही रॉकेट हे त्यांच्या घरावरही पडले. तर काही रॉकेटचा आवाज सतत येत होता.