श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर- चिपळूण तालुक्यातील निवळी येथील नाभिक समाजातील रहिवाशी अनंत दगडू कदम यांचे सुपुत्र अनिकेत अनंत कदम यांनी रेल्वे सुरक्षा बल मध्ये ठाणे येथे चोरी करून पळून जाणाऱ्या महिला आरोपीस आपला जीव धोक्यात टाकून पकडत असता सदर महिलेने कदम यांच्यावर आपल्याकडील चाकू उभारून मारण्याचा प्रयत्न केला असतानाही कदम यांनी जीवाची परवा न करता आपली कामगिरी चोख बजावून सदर महिलेला शिताफिने पकडले.
या कामगिरी शौर्य बद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून (MSF स्टाफ) अनिकेत कदम यांचा प्रशस्तीपत्र देऊन यथोचीत सन्मान करण्यात आला. या कामगिरीबद्दल साप्ताहिक पोलीस तपास ( वार्तापत्र) चे पत्रकार दिनेश अंब्रे , शीतल अंब्रे , व धनश्री कदम परिवाराने विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.