देशासोबत गद्दारी; पाकिस्तानसाठी हेरगिरी; एटीएसने ठाण्यातून एकाला उचललं..

Spread the love

*मुंबई-* राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून पाकिस्तानी तपास यंत्रणांना भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून या व्यक्तीच्या चौकशीतून आरोपी हा पाकिस्तानच्या इंटेलिजन ऑपरेटिव्हच्या नोव्हेंबर 2024 पासून संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. फेसबुकद्वारे त्याची ओळख पीओआयशी संबधित व्यक्तीसोबत झाली होती. त्यानंतर, 2024 ते 2025 पर्यंत या व्यक्तीने भारताने प्रतिबंधक केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. देशाविरुद्ध गद्दारी करणारा हा व्यक्ती ठाण्याचा असून एटीएसकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

पहगलाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाकिस्तानला व दहशतवाद्यांना थेट इशारा दिला होता. त्यानुसार, भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या घटनेनंतर देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या कामगिरीचा अभिमान बाळगला जात आहे. मात्र, दुसरीकडे हेरगिरी प्रकरणात हरयाणातील ज्योती मल्होत्रा या सोशल मीडिया एन्फ्लुअर्सलाही अटक करण्यात आली आहे. होय, आम्ही पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याची कबुली ज्योतीने तपासादरम्यान दिली. त्यामुळे आता ज्योती मल्होत्राच्या अडचणीत वाढ होणार आहे.

याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत सांगण्यात आलं नसून वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तावरुन ही माहिती समोर आली आहे. त्यातच, आता ठाण्यातून आणखी एका देशाच्या गद्दाराला अटक करण्यात आली आहे. देशहिताची गोपनीय माहिती पीओआयला पुरवल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून या प्रकरणी संबंधित व्यक्तीयासह तो संपर्कात असलेल्या POI च्या 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दहशतवाद विरोधी पथकाने कलम 3 (1), ब, 5 (अ), भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 61 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, अधिक तपास दहशतवाद विरोधी पथक करत आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्ती हा ठाण्याचा राहणारा आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page