महाराष्ट्र ; राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्याच्या अनेक भागातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे, पुणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
तर आज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
त्याचबरेबर गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.दरम्यान मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहर परिसरात सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईत आजही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
तर पुणे शहर परिसरात मात्र पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जाहिरात