
संपादकीय:
भ्रष्ट व्यवस्थेने आपला निघून खून केला, आपल्या खुनाचा बदला लोकशाही मार्गाने, व्यवस्था परिवर्तन करून घेतला जाईल, सर्व कार्यकर्त्यांवर आपले आयुष्याचे, जीवाचे कर्ज आहे.
पोलीस खात्याचे विशेष आभार ?
असेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संपविण्याचा लाजिरवाणा प्रयत्न गुंडांना पेड करून करत राहा? उद्या होणाऱ्या असंतोषाची जबाबदारी देखील घ्या? खोटे गुन्हे आणि ५५, ५६ चे खोटे प्रस्ताव ? लक्ष्यात घ्या , भ्रष्ट व्यवस्था आणि आम् जनता (आपल्यासह) यात मध्ये , rti कार्यकर्ते, व्हिसल ब्लोअर activist आहेत म्हणून शोषण कमी होत आहे, एकदा का, ही फळी संपली की घरात घुसून ठार करतील हे भ्रष्ट लोक? अजूनही विचार करा, rti कार्यकर्त्यांना साथ दया. शहिद संतोष कदम च्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून आणखी असंख्य कार्यकर्ते प्रेरित होवून काम करतील. आम्ही शपथ घेतो आम्ही दहशत घेणार नाही, सेटिंग करणार नाही , संयमाने आणी नियतीने, लोकशाही मार्गाने भ्रष्ट व्यवस्था विरुद्ध लढत राहू आम्ही संपणार नाही, भिनार नाही, दहशत घेणार नाही, संतोषजी, आम्हाला आपला अभिमान आहे, आपण जीव दिला, पण संयमाने व्यवस्था परिवर्तनाची, समाजासाठीची ही लढाई , आपल्यावर सतत हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल होवूनही लढली
आम्ही सर्व भारतीय जागरूक नागरिक कायम शहीद संतोष कदम यांच्या ऋणात राहू, मरेपर्यंत आणि जीव असेपर्यंत आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध संयमाने , नियतीने, लोकशाही मार्गाने लढत राहू
संपादकीय.