वीज पुरवठा दिलेले अनधिकृत बांधकाम कोसळून दुर्घटना घडून जिवीत व वित्तहानी झाली तर, त्यास टोरंट कंपनीचे सर्व अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ठाणे : शहरातील बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून टिकेचे धनी ठरत असलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामे विरोधात कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईसाठी पालिकेकडून बांधकामांचा आढावा घेऊन नियोजन आखण्यात येत आहे. ईद या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बेकायदा बांधकामांवरील कारवाईला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा दिल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यकारी अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी नगर अभियंत्यास दिले आहेत. त्यापाठोपाठ आता पालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा बांधकामांचा आढावा घेऊन त्यांच्यावर कारवाईची तयारी सुरू केली आहे. यानुसार नव्याने सुरु झालेल्या बांधकामांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. सुरूवातीला पहिल्या किंवा तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकामे झालेल्या आणि त्यानंतर पूर्णत्वास आलेल्या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात सर्वाधित बेकायदा बांधकामे सुरू असल्याची माहिती पालिकेच्या हाती आली असून या भागातील बाधकामांपासून कारवाईला सुरूवात होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
जाहिरात