
राजापूर :- तालुक्यातील हातिवले येतील टोल नाका काही अज्ञातानी फोडल्याची घटना आज सायंकाळी घडली.
गणेशोत्सव महिन्यावर आलेला असतानाही शासन – प्रशासन मुंबई – गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या लोकांनी आपला राग राजापूर – हातिवले येथील टोल नाक्यावर काढला आहे.
आज गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातानी घोषणा देत अचानक हातिवले येथील टोलनाक्याकडे आपला मोर्चा वळवत या टोलनाक्यावरील केबीनची मोडतोड केली असून केबीनच्या काचा फोडल्या आहेत .
जाहिरात

जाहिरात

