
दबाव वृत्त – ठाण्याच्या पुढील प्रवास म्हणजे वाहतूक कोंडीत अडकलेला प्रवास असेच काहीसे म्हटले जाते. अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासासाठी येथील प्रवासी तासनतास कोंडीत अडकून पडतात. बदलापूर, कल्याण, नवी मुंबईतील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका व्हावी म्हणून शीळ रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.

पलावा येथे उड्डाणपूल, ऐरोली काटई बोगदा उभारण्यात येत आहे. या सुरू असलेल्या विकास कामांची कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प गतीने करण्याच्या सूचना दिल्या. शिळफाटा उड्डाणपुलाचे प्रगतीपथावर असलेले काम लवकरच बहुतांशी पूर्ण होणार असून त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत यातील तीन मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत.
जाहिरात



जाहिरात
