
दिनेश आंब्रे/ संगमेश्वर- कसबा शास्त्रीपूल पारकरवाडा येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. बहाब दळवी यांचे मोठे बंधू श्री. असलम दळवी यांचा सुपुत्र कु. आसीम असलम दळवी याने वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करत डॉक्टर होण्याचा मान मिळविला. या गौरवप्रसंगी कसबा हन्नफी जमात, दखनी मोहल्ला मुस्लिम समाज हन्नफी जमातीतर्फे, दळवी मांच्या शास्त्रीपूल येथील निवासस्थानी त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण साहेब आणि हन्नफी जमातीचे अध्यक्ष अल्लीखान नाना यांच्या शुभहस्ते कु. आसीम असलम दळवी याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास हन्नफी जमातीचे ज्येष्ठ सदस्य श्री. अशरफ शहा, सिराज दळवी, कादर दळवी, इलियास मापारी, शाफई जमातीचे माजी अध्यक्ष हनिफ खलफे, मौअज्जम पिरखान, रियाज नगारजी, संगमेश्वर मापारी मोहल्ला जमातीचे अध्यक्ष रऊफ खान, अल्ताफ कापडी, असलम दळवी, मन्सूर खान, कु. उमेर दळवी, नाईफ दळवी, सौ. नसीरा रांगणेकर, सौ. अल्फिया दळवी, हरून दळवी, मौज दळवी, पोलीस अधिकारी जोशी, ज्येष्ठ पत्रकार मुजीब खान, नियाज खान, दीपक तुळसणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार श्री. बहाब दळवी यांनी केले.