डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागातील हरितपट्ट्यावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या बेकायदा बांधकाम परवानग्या बनवून, त्या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाचा रेरा नोंदणी क्रमांक मिळवून १० बेकायदा इमारतींची उभारणी करणाऱ्या भूमाफियांच्या बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई मंगळवारी पालिकेने सुरू केली. या कारवाईने पालिकेने माफियांना मोठा दणका दिला आहे.
डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा हरितपट्ट्यातील बेकायदा इमारतींवर हातोडा