ठाणे : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बेडेकर नगर शाखेतर्फे दरवर्षी प्रमाणे घेण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभाला बेडेकर नगर मधील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. मनसेच्या बेडेकर नगर महिला शाखाध्यक्षा अंकिता कदम आणि उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम यांच्याकडून महिलांसाठी खास मंगळागौरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कदम यांनी केले.
या हळदीकुंकू कार्यक्रमाला मनसेच्या महिला राज्य उपाध्यक्षा सौ. दिपीका पेडणेकर आणि दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी उपस्थिती दाखवली. यासोबतच सौ सपना क्रांती पाटील, शाखाअध्यक्षा सौ नम्रता मस्के, सौ सीमा तुषार पाटील, सौ सपना परेश पाटील, सौ संगीता उत्तेकर, दिवा गाव चे पोलीस पाटील श्री प्रशांत पाटील, शहर सचिव श्री प्रशांत गावडे, विभाग सचिव श्री परेश पाटील, उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश भगत, भानुदास पाटील, सोनिश माधव, चैतन्य गावडे, विश्वनाथ बेडेकर, प्रविण उत्तेकर, जयसिंग कांबळे, कपिल रोडे, उमेश शिंदे, तसेच बेडेकर नगर शाखा, महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी या मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली.