
वयोवृद्ध काळात विद्यार्थ्या कडील सत्काराने गुरूवर्य भारावले
दिनेश अंब्रे /संगमेश्वर- विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते शालेय जीवनात अद्यावत असतेच, अभ्यासात मग्न असणारा अभ्यासू विद्यार्थी व त्याला यथायोग्य मार्गदर्शन करणारे त्याचे शिक्षक (गुरू) यांचे नाते अतुट असते.परंतु शालेय शिक्षण विद्यार्थ्याचे पूर्ण झाल्यावर व गुरूंची शिक्षकी सेवा संपल्यावर सुद्धा अनेक वर्षां नंतर हे दोघेही एकमेकांना न विसरता विद्यार्थी हा आपल्या शिस्तप्रिय, आदर्श, सदाचारी, वक्तशीर शिक्षक म्हणजे गुरूची आठवण ठेवून वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असुर्डे ( आंबतखोल) येथील सेवा निवृत्त मुख्याध्यापक एम्.के. पाटील सर यांच्या घरी जाऊन एक माजी विद्यार्थी (एस्एस सी १९७७ची बॅच) सद्ध्या सामाजिक कार्यकर्ता, जेष्ठ पत्रकार, सहसंपादक, समाज प्रबोधनकार सुरेश साळवी यांनी कृतज्ञता करून गुरुपौर्णिमेला प्रत्यक्ष शाल पांघरून श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन सत्कार केला,याच्या शिवाय गुरु शिष्याच्या आयुष्यात वेगळा आनंद कोणता?

इतक्या वर्षांनंतरही चांगल्या कामामुळे मला माझे जुने विद्यार्थी प्रत्यक्ष येऊन भेटतात व गुरुपौर्णिमेला शुभेच्छा देतात.म्हणून गुरूवर्य पाटील सर या शुभेच्छा व सत्कार प्रसंगी व माजी विद्यार्थी सुरेश साळवी भावूक झाले. खर्या अर्थाने आज गुरूपौर्णिमा आज साजरी झाली असे बोलून पाटील सर यांनी गुरू शिष्याच्या नात्याला छान उजाळा दिला.