राजापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना हटवण्यात आले आहे असून नूतन शहर प्रमुख म्हणून नागेश कुरूप यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.संघटनात्मक कौशल्य असलेले नूतन शहर प्रमुख नागेश कुरूप यांना हे पद दिल्याने शहरातील शिवसैनिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर याचे पडसाद ग्रामीण भागापर्यंत पाहायला मिळाले. अशातच लांजा शहरातील नगरसेवक, आणि नगराध्यक्षांनी शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला लांजा शहरात जोरदार धक्का बसला होता. तेव्हापासूनच शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांची पदावरून हकालपट्टी केली जाणार अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शहर प्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना न हटवल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी निर्माण होऊ लागली होती. खुद्द खासदार विनायक राऊत हे देखील देसाई यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही होते. अखेर शिवसेना शहर प्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना हटवण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा