
संगमेश्वर- दिनेश आंब्रे
दिनांक ३/७/२०२३ रोजी शाळा लोवले पडयेवाडी येथे गुरुपौर्णिमा साजरी करणेत आली.यानिमित्ताने विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व शिक्षकांनी सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी गुरुप्रती प्रेम व्यक्त करण्याचे प्रतिक म्हणून सुंदर पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प शिक्षकांना अर्पित केले शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
संध्याकाळी ५ वा. आद.दिनेश आमरे आणि आद.जनार्दन शिरगावकर सर यांनी शाळेला भेट दिली. “जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा” या देशभक्तीपर गीताने विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मुख्याध्यापक राजेश कांबळे सर, उपशिक्षिका शितल कांबळे मॅडम आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गुरुपौर्णिमेचे महत्त्व कथन केले विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.सोबत श्री.दत्ताराम लोहलकर हे होते.
शाळा आणि शाळाव्यवस्थापन कमिटीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.