
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील १७ लाख शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. या संपामुळे सामान्य जनतेचे हाल होत असून अनेक शासकीय कार्यालयांनाही टाळं लागले आहेत. दरम्यान, हा कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचं मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात. मात्र, त्यांनी पुरकारलेला संप बेकायदेशीर आहे. याप्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
जाहिरात
