गुजरातचा धुव्वा उडवत मुंबईची क्वालिफायर 2 मध्ये धमाकेदार एंट्री; मुंबई इंडियन्सचा सामना पंजाबशी होणार…

Spread the love

मुल्लानपूर- एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. यासह, मुंबई इंडियन्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होईल. एलिमिनेटर सामन्यात, प्रथम खेळणाऱ्या मुंबईने 228 धावांचा मोठा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, गुजरातला शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात फक्त 208 धावा करता आल्या. रोहित शर्मा आणि साई सुदर्शन यांनी या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्माने धडाकेबाज ८१ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला २२८ धावांचा डोंगर उभारता आला. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल तर लवकर बाद झाला. पण साई सुदर्शन हा मुंबईच्या विजयाच्या मार्गात मोठा अडसर ठरला होता. साई सुदर्शनने अर्धशतक झळकावले आणि तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊ जात होता. साईला यावेळी वॉशिंग्टन सुंदर चांगली साथ देत होता. पण या दोघांना मुंबईने आपल्या जाळ्यात ओढत बाद केले आणि सामना फिरवला. मुंबईच्या संघाने दमदार फलंदाजी तर केली, पण अचूक गोलंदाजी करत त्यांनी या सामन्यात विजय साकारला.

मुंबईच्या २२९ धावांचा पाठलाग करण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला, पण पहिल्याच षटकात त्यांना शुभमन गिलच्या रुपात मोठा धक्का बसला. त्यानंतर कुशल मेंडिसली लवकर बाद झाला. पण त्यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या डावखुऱ्या जोडीने धमाकेदार फटकेबाजी केली. या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे ही जोडी आता गुजरातला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण मुंबईने सुंदरला ४८ आणि साईला ८० धावांवर बाद केले आणि हा सामना गुजरातच्या हातून निसटला. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी अप्रतिम मारा केला. एलिमिनेटरचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. कारण हा सामना जो गमावणार होता, त्याचे आव्हान संपुष्टात येणार होते.


गुजरातची बॅटिंग

मुंबईने 229 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. ट्रेंट बोल्टने कॅप्टन शुबमन गिल याला 1 रनवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यानंतर साई सुदर्शन आणि कुसल मेंडीस जोडी चांगलीच जमली होती. मात्र कुसल मेंडीस याने पायावर धोंडा मारला. कुसल हिट विकेट झाला आणि मुंबईला गिफ्टमध्ये आपली विकेट दिली. कुसलने 20 रन्स केल्या. कुसल आणि साईने दुसऱ्या विकेटसाठी 64 रन्सची पार्टनरशीप केली.

त्यानंतर साई आणि वॉशिंग्टन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. ही जोडी मुंबईवर पूर्णपणे वरचढ ठरली. हे दोघे जोपर्यंत मैदानात होते तोवर गुजरातचा विजय निश्चित समजला जात होता. दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यामुळे मुंबईच्या हातातून सामना गेला होता. मात्र मुंबईने हार मानली नाही. मुंबई विकेटच्या शोधात होती. मुंबईच्या विकेटची प्रतिक्षा जसप्रीत बुमराह याने संपवली. बुमराहने अचूक यॉर्कर टाकत वॉशिंग्टनला क्लिन बोल्ड केलं आणि सेट जोडी फोडली. वॉशिंग्टन आणि साईने तिसऱ्या विकेटसाठी 84 रन्सची पार्टनरशीप केली. वॉशिंग्टन 24 बॉलमध्ये 48 रन्स करुन आऊट झाला.

गुजरातचा हिशोब क्लिअर

त्यानंतर मुंबईला मोठी विकेट मिळाली. रिचर्ड ग्लीसन याने साई सुदर्शन याला बोल्ड केलं आणि मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. साईने 49 बॉलमध्ये 80 रन्स केल्या. साईच्या विकेटसह मुंबईने विजयाचा दावा ठोकला. मात्र गुजरातही सामन्यात कायम होती. मात्र मुंबईने ठराविक अंतराने गुजरातला आणखी 2 झटके दिले आणि विजयी धावांपर्यंत पोहचण्यापासून रोखलं. टेंट्र बोल्टने शेरफेन रुदरफोर्ड याला 24 रन्सवर तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. अश्विनी कुमार याने शाहरुख खान याला 13 रन्सवर सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं. तर राहुल तेवतिया 16 रन्सवर नॉट आऊट परतला. मुंबईने यासह क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश निश्चित केला आणि गुजरातच्या 2 पराभवाचा हिशोब चुकता केला. गुजरातने मुंबईला या हंगामातील साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं.

मुंबईची क्वालिफायर 2 मध्ये धडक

मुंबईकडून ट्रेंट बोल्ट याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिचेल सँटनर आणि अश्वनी कुमार या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. आता मुंबईचा 1 जून रोजी क्वालिफायर 2 मध्ये पंजाब विरुद्ध सामना होणार आहे. मुंबई-पंजाब यांच्यातील विजेता संघ अंतिम फेरीत आरसीबी विरुद्ध भिडणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page