दिल्लीकडून गुजरातचा सहा विकेट्सनं पराभव, फक्त 9 षटकांत साकारला विजय…

Spread the love

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएलचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातला संघाला केवळ 89 करत्या आल्या. प्रत्यूत्तरात दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला.

अहमदाबाद : आजचा आयपीएल सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्लीनं नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं दिल्लीला 49 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरात दिल्ली संघानं हे आव्हान यशस्वीपणे पेलून विजय संपादन केला. यावेळी दिल्लीनं गुजरातवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.

दिल्लीच्या दमदार सुरुवात…

गुजरातच्या 90 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात दमदार झाली. दिल्लीनं पहिल्या षटकात 14 धावा केल्या, पण दुसऱ्या षटकात जेक प्रेझरच्या रूपानं त्यांना पहिला धक्का बसला. जेकनं 10 चेंडूत 20 धावा केल्या. त्यानंतर पृथ्वी शॉही मोठ्या फटकेबाजीत बाद झाला. त्याला केवळ 7 धावा करता आल्या. त्यानंतर अभिषेक पोरेल आणि शाई होपच्या रूपानं दिल्लीला दोन धक्के बसले. पण त्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला आणि त्यानं दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

चांगली फलंदाजी करण्यात जीटीला अपयश….

नाणेफेक हारल्यानंतर गुजरात टायटन्सनं 17.3 षटकात 89 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खाननं सर्वाधिक धावा केल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या राशिदनं 24 चेंडूंत 31 धावा केल्या, ज्यात दोन चौकार तसंच एका षटकाराचा समावेश आहे. डीसीचा कर्णधार ऋषभ पंतनं दोन झेल घेतले. जीटीच्या केवळ 48 धावांतच 6 विकेट पडल्या. कर्णधार शुभमन गिल (8), अभिनव मनोहर (8), रिद्धिमान साहा (2), मोहित शर्मा (2), डेव्हिड मिलर (2) आणि नूर अहमद (1) यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. साई सुदर्शननं 12 आणि राहुल तेवतियानं 10 धावांचं योगदान दिलं. शाहरुख खानला खातंही उघडता आलं नाही. दिल्लीतर्फे मुकेश कुमारनं तीन, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळं बाहेर…

डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळं बाहेर आहे. सुमित कुमारनं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. ऋद्धिमान साहा तसंच डेव्हिड मिलरचं पुनरागमन झालं आहे. उमेश यादवच्या जागी संदीप वारियरला संधी मिळाली आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हा सातवा सामना आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघानं आतापर्यंत तीन सामने जिंकले आहेत. तर, तीन सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागलाय. गुजरात टायटन्सचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध झाला. ज्यामध्ये त्यांनी तीन विकेट्सनं विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ नवव्या स्थानावर आहे. डीसीनं चार वेळा पराभवाचा सामना करताना केवळ दोन सामने जिंकले आहेत. आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीनं लखनऊ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला.

▪️गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर.

▪️दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page