गुहागर तालुका सुपुत्र, वरळी विधानसभा शिवसेना माजी नगरसेवक श्री दत्ता नरवणकर यांनी विरार नालासोपारा वसई मधील कोकणवासियांसाठी उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका त्यांचा लोकार्पण सोहळा जोरदार दिमाखात संपन्न…

Spread the love

वसई- गुहागर तालुक्यातील व कोकणातील जास्त लोक विरार नालासोपारा वसई मध्ये राहतात आणि त्यांना कधीही वैद्यकीय विषयी समस्या आली कि मुंबई रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी त्यांना दाखल कराव लागत आणि रुग्णवाहिकाचे भांडे गरिबांना परवडत नाही म्हणून संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम सदस्य, स्व तानाजी डाफळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री मनोज डाफळे यांनी सरकार कडे गुहागर तालुका ते मुंबई आणि विरार ते मुंबई गुहागर अशा दोन रुग्णवाहिकाची मागणी केली होती पण होत नव्हती म्हणून स्वतः पुढाकार घेऊन गुहागर तालुका सुपुत्र, शिवसेना वरळी विधानसभा प्रमुख, माजी नगरसेवक श्री दत्ता नरवणकर यांच्या कानावर हा विषय घालता त्यांनी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो असा शब्द दिला आणि एक महिना मध्ये त्यांनी विरार नालासोपारा वसई मधील रुग्णासाठी उपलब्ध करून दिली…


त्यांचा लोकार्पण सोहळा दुपारी वरळी येथे  स्वतः शिवसेना माजी नगरसेवक श्री दत्ता नरवणकर साहेब आणि पदाधिकारी यांचा हस्ते संपन्न झाला….
*त्यावेळी संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम मार्फत उपसचिव आदेश जाधव, सदस्य अविनाश माटल, सदस्य महेंद्र आंबेकर, रुग्णसेवक विनोद करबळे आणि स्व. तानाजी डाफळे प्रतिष्ठान अध्यक्ष, संतोष दादा जैतापकर वैद्यकीय सदस्य श्री मनोज डाफळे उपस्थित होते…

त्या नंतर त्या रुग्णवाहिनी च विरार मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.. त्या कार्यक्रमा साठी शिवसेना वसई तालुका प्रमुख. श्री सुदेश चौधरी, शहर प्रमुख श्री उमेश गोवेकर, शिवसेना उबाटा विरार शहर प्रमुख श्री उदय जाधव, उपशहर प्रमुख मिर्लेस्कर, भाजपा कोकण विकास आघाडी विरार अध्यक्ष सौ नेहा ताई शिंदे, शिवसेना उपशहर प्रमुख साटम, संतोष दादा जैतापकर वैद्यकीय अध्यक्ष श्री संदीप खैर, गुहागर प्रतिष्ठान अध्यक्ष श्री योगेश कदम, श्री गजानन डाफले, भाजपा महिला पदाधिकारी सुर्वे मॅडम, शाखा प्रमुख राजेंद्र सावंत व वैद्यकीय टीम सदस्य उपस्थित सदस्य, संपर्क प्रमुख उपस्थित होते…

विरार मधील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम सदस्य स्वजन जोगळे, संतोष भुवड, पुरषोत्तम कदम,दिनेश नवरत, विजय दणदणे, एकनाथ बारस्कर, मनोहर दवंडे, सुनिल गोणबरे, प्रवीण किर्वे आणि वैद्यकीय टीम गाव संपर्क प्रमुख, पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.*..
*उपस्थित सर्वांचे स्व.तानाजी प्रतिष्ठान व संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम मार्फत सत्कार करून आभार मानण्यात आले..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page