
मंत्रालयात पालकमंत्री यांनी घेतली ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांची बैठक,प्रकल्प उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन…
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा ,स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे प्रयत्नशील आहेत. ताज हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत चटवाल आणि कार्यकारी उपाध्यक्ष बीजल देसाई तसेच ताज हॉटेल इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापणासोबत बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधिताना केले आहे. पर्यटन क्षेत्रात विश्वासार्हता असलेल्या ताज हॉटेल्सने सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक उंचीवर नेण्यासाठी प्रकल्प उभारावा आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करू असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.