
१८ मे/रत्नागिरी-महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अग्निशामक वाहनाचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी नगरपरिषदेला नवीन अग्निशामक वाहन खरेदीसाठी 55 लाख रुपये मंजूर झाले होते. या अनुदानातून रत्नागिरी नगर परिषदेने नवीन अग्निशमन वाहन खरेदी केले आहे. या वाहनाची पाणी साठवणूक क्षमता 5 हजार लिटर असून त्यात फोम वापराचीही सुविधा आहे.