पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरुख शहरासाठी १० कोटीचा निधी केला मंजूर…

Spread the love

देवरुख शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हापूर टाईप बंधाऱ्यासाठी ६ कोटी रूपये व देवरूख नगरपंचायतीच्या इमारतीसाठी ४ कोटीचा निधी मंजुर

भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष व देवरूख नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी देवरूखवासियांच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांना दिले धन्यवाद

संगमेश्वर- रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरूख शहरासाठी तब्बल १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. देवरुख शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने कोल्हापूर टाईप बंधाऱ्यासाठी ६ कोटी रूपये व देवरूख नगरपंचायतीच्या इमारतीसाठी ४ कोटीचा निधी मंजुर केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरूख शहरासाठी १० कोटी रूपये मंजूर करून देवरुखवासियांना मोठे गिफ्ट दिले आहे.

भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष व देवरूख नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपुर्वीच पालकमंत्री उदय सामंत भेट घेऊन देवरुख शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बंधाऱ्याची गरज असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणुन दिले होते. पालकमंत्री महोदयांनी त्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेत देवरूख शहराच्या बंधाऱ्यासाठी सहा कोटीचा निधी मंजूर केला. आज पुन्हा पालकमंत्री महोदयांच्या भेटीकरीता अभिजीत शेट्ये व सहकारी गेले असता या निधी मंजुरीचा शासन निर्णयच हाती देत पालकमंत्री उदय सामंत यांनी समस्त देवरुखच्या नागरिकांना सुखद धक्काच दिला आहे.

त्याचबरोबर नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून दिला. याकामी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, आमदार शेखर निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, आमदार शेखर निकम यांना समस्त देवरुख वासियांच्यावतीने अभिजीत शेट्ये यांनी धन्यवाद दिले आहेत. तर रत्नागिरीत जावून अभिजीत शेट्ये व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी भाजपचे देवरूख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये, माजी उपनगराध्यक्ष वैभव कदम, माजी नगरसेवक यशवंत गोपाळ व भाजप देवरूख रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रमोद शिंदे उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page