
*सिंधुदुर्ग-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. आज गुरुवारी संध्याकाळी त्यांनी कणकवली बाजारपेठेत सुरू असलेल्या एका मोठ्या मटका अड्ड्यावर स्वतः छापा टाकत अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनीच थेट मटका अड्ड्यावर धाड टाकल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, पालकमंत्री नितेश राणे आपल्या सहकाऱ्यांसोबत थेट अड्ड्यावर पोहोचले. अचानक पालकमंत्र्यांना समोर पाहून मटका चालवणाऱ्यांची आणि तिथे असलेल्या काहींची एकच धांदल उडाली. यावेळी पैसे मोजणे, पावत्या करणे अशी काहीजण कामे करत होते. हे दृश्य पाहून नितेश राणे संतप्त झाले. त्यांनी तात्काळ संबंधित लोकांना खडसावले आणि हा काय प्रकार आहे? मंत्री महोदयांनी संबंधितांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन घटनास्थळी बोलवले. नितेश राणेंच्या धाडीनंतर कणकवली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई सुरू केली.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*