रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देवरूख: वार्ताहर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या मागणीनुसार विशेष ग्रामसभा सोमवार २८ ऑगस्ट २०२३ रोजी कोळंबे वस्तीगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोळंबे सोनगीरी समन्वय युवा सामाजिक संघटना व ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांची उत्तरे व गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यासाठी सभेस
पहा सविस्तर…. नेमक काय घडलं ग्रामसभेत
देवरूख संगमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. भरत चौगुले , विस्तार अधिकारी श्री.गिरी व श्री. गुळे उपस्थित होते परंतु गावातील स्थानीक नागरिकांच्या व्यथा न ऐकताच अधिकारी धाक स्थानीक ग्रामस्थांना दाखवत गावचे सरपंच श्री.रघुनाथ पडवळ, उपसरपंच श्री.चंद्रकांत भरणकर व ग्रामसेविका मीनाक्षी गुरव यांना पाठीशी घालून शासानाचा निधी कुठलाही ठराव नसताना संगन मताने गैरव्यवहार करीत होते
ही बाब सदर संघटना व स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येता गावातील ग्रामस्थांनी गैरव्यवहार प्रकरणी प्रश्नाची सरबत्ती करताच गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी आलेले अधिकारी ग्रामस्थांना कुठ्ल्याही प्रकारच्या विश्वासात न घेताच निघून गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये सरकारी अधिकारी आणि गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या मध्ये साठे-लोटे आहे का? असा प्रश्न चिन्हं निर्माण झाला आहे. तसेच गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी अशी मागणी कोळंबे सोनगीरी समन्वय युवा सामाजिक संघटना व स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे.
जाहिरात