मंडणगड नगरपंचायतीत 17 विकासकामांचे भूमिपूजन

Spread the love

१० मे/मंडणगड: मंडणगड शहराचे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध प्रभागात नाविन्यपूर्ण योजनेच्या अंर्तगत 2 कोटी 5 लाखांच्या निधीच्या विनियोगाच्या 17 विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

विकासकामांचे भूमिपूजन नारळ त्या त्या प्रभागातील ज्येष्ठ व मान्यवरांच्या हस्ते वाढवण्यात आले. यात आदर्शनगर बोरीचा माळ परकर गुरूजी यांच्या घराजवळ भूमिपूजन, सापटेवाडी उदय गोसावी यांच्या घराजवळ, दुर्गवाडी भैरी मंदिर भेकतवाडी भूमिपजून व जाहीर सभा, प्रमोद काटकर यांच्या घराशेजारी, साईनगर पटांगण येथे, धनगरवाडी येथे, कुंभारवाडी वाघजाई मंदिर येथे, तुरेवाडी येथे, कृष्णानगर येथे त्याचबरोबर परिवार पार्क मंडणगड येथेही भूमिपूजन करण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रमात शहरातील दुर्गवाडी येथील भैरी मंदिरात आयोजित जाहीर कार्यक्रमात येथील नागरिकांना संबोधित करताना मंडणगड शहराच्या विकासाकरिता आपण कटिबद्ध असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले. शहरविकासाच्या प्रश्नावर ते करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी या वेळी विस्ताराने माहिती दिली. दापोली-खेड शहरांबरोबर मंडणगड शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांची निर्मिती व विकासाच्या प्रश्नात राजकारण न करता सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी माजी सभापती आदेश केणे, अनंत लाखण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, बांधकाम सभापती प्रियांका लेंडे, नगरसेवक तथा शहरप्रमुख विनोद जाधव, आदेश मर्चंडे, सुभाष सापटे, प्रमिला किंजळे आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page