ग्रेट न्यूज! एसटी तिकिटाची बुकिंग आता अ‍ॅपवर करता येणार

Spread the love

एसटी महामंडळाच्या बससेवेची महाराष्ट्राच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका आहे. सर्वसामान्यांपासून सर्वचजण बसने प्रवास करत असतात. मात्र, अनेकदा लांबच्या प्रवासासाठी जागा मिळवणे हे आव्हान असतं. जागा मिळाली नाही, की लांबचा प्रवास कष्टदायक होतो. म्हणूनच एसटी महामंडळाच्या तिकिट आरक्षणाला प्रवासी प्राधान्य देतात. मात्र, महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन तिकिट आरक्षित करताना अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. आता यावर उपाययोजना करून महामंडळाने प्रवाशांना एसटीचं तिकिट अ‍ॅपवर बूक करण्याचा पर्याय दिला आहे. लवकरच या सुविधेची सुरुवात होणार आहे. याबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका कार्यक्रमात माहिती दिली.

सध्याच्या तिकिट आरक्षण प्रणालीत नेमक्या काय त्रुटी?

सद्यस्थितीत एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर तिकिट बुकिंग करताना अनेकदा प्रवासांच्या खात्यातून पैसे वजा होतात, मात्र, जागा आरक्षित होत नाही. यानंतर संबंधित प्रवाशांना ते पैसे मिळवण्यासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. याशिवाय अनेकदा तिकिट आरक्षित करण्यासाठी आरक्षित जागा असलेल्या बसेस उपलब्ध हो नाहीत. तसेच तिकिट बुकिंगनंतर चुकीचे आसनक्रमांक आल्याचीही तक्रार प्रवाशांनी केली आहे. तिकिट बूक करताना महामंडळाची वेबसाईटच बंद झाल्याचेही प्रवाशांना अनुभव आले आहेत.

नव्या अ‍ॅप बुकिंगमध्ये काय उपाययोजना?

एसटी महामंडळाकडून लाँच करण्यात येणाऱ्या नव्या अ‍ॅपवर प्रवाशांना केवळ डेबिट-क्रेडिट कार्डवरूनच नाही, तर अगदी त्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांच्या माध्यमातूनही पेमेंट करता येणार आहे. या अ‍ॅपवर प्रवाशांना त्यांनी तिकिट आरक्षित केलेली बस नेमकी कुठं आहे हेही तपासता येणार आहे. त्यामुळे बसची वाट पाहत राहणं बंद होणार आहे. तसेच प्रवाशांना आपली कामं करून बसच्या वेळेत उपस्थित राहता येईल. या सुविधेसाठी राज्यातील ११ हजार बसमध्ये वाहन देखरेख प्रणालीचा वापर होणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page