
पोफळी (ता. चिपळूण): येथील नामवंत व निस्वार्थ सेवेचे प्रतीक असलेले कै. डॉक्टर शिवाजीराव दाजीरामशेठ मानकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोफळी पंचक्रोशीतील एक हरहुन्नरी, सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
डॉ. मानकर यांनी गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देत सामाजिक क्षेत्रातही आपली खास ओळख निर्माण केली होती. अत्यंत मनमिळावू, नम्र आणि सेवाभावाने कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा अंत्यविधी आज रात्री ८ वाजता पोफळी येथे होणार आहे.