चिपळूण : चिपळूण संगमेश्वर चे लोकप्रिय आमदार माननीय श्री शेखर निकम सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा राष्ट्रवादी युवक युवती काँग्रेसच्या वतीने खेरडी चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खूप आनंद झाला. कबड्डी हा आपला राज्यस्तरीय खेळ असून त्याला बळ देण्याचा काम याचे आयोजक श्री दशरथ शेठ दाभोळकर, अबुषेठ ठसाळे, रियाज बाई खेरटकर व सर्व राष्ट्रवादीचे युवक युवती या लोकांनी केलं आहे.
आपले लाडके आमदार श्री शेखर निकम सर यांच्या हस्ते माझा यतोचित सन्मान करण्यात आला त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार व्यक्त केला व त्यांच्या जन्मदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा दिल्या. मला तिथं बोलावून माझा सन्मान करण्याबद्दल श्री. दशरथशेठ दाभोळकर, श्री. रियाज भाई खेराटकर यांचे खूप आभार मानले.
यावेळेस चिपळूण – संगमेश्वर चे लाडके आमदार श्री. शेखर निकम सर, माजी सभापती पूजा निकम मॅडम, श्री. शेखर निकम सर यांची दोन्ही मुलगी, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कोकण प्रमुख श्री. सैफ सुर्वे, श्री. दशरथशेठ दाभोळकर, श्रीमती. दिशाताई दाभोळकर, श्री. रियाज भाई खेराटकर, श्री. मयूरजी खेतले, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर कदम, युवक जिल्हाध्यक्ष आतिफ गोठे, महाराष्ट्र फुटबॉल संघाचा उपकर्णधार श्री. झीयान नेवरेकर, आदी., उपस्थित होते.
जाहिरात: