नेरळ बाजारपेठेतील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच,व महिला सदस्या रस्त्यावर उतरले….

Spread the love

नेरळ- सुमित क्षीरसागर

        नेरळ शहरात वाहतूक कोंडीला अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात तर नेरळ रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर मांस विक्री करणाऱ्या विरोधात नेरळ ग्रामपंच्यायतीच्या सरपंच व महिला सदस्यांनी थेट रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत कर्मचारी वर्गला दिले आहेत तर नेरळ पोलिसांच्या मदतीने शहरात बेशिस्त पार्क केलेल्या वाहनावर देखील कारवाई होणार असल्याने आता लवकरच नेरळ बाजार पेठेत नागरिकांना उदभवणाऱ्या समस्या मिटणार असल्याचे चित्र दिसत आहे.
        कर्जत तालुक्यातील नेरळ बाजारपेठ ही सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे त्याच सोबत जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणारे माथेरान जाण्यासाठी नेरळ हे स्थानक जवळ असल्याने नेरळ शहराला व येथील बाजारपेठेला फार महत्व आहे.मात्र सध्या नेरळ शहर व बाजारपेठ ही वाहतूक कोंडीने ग्रासली आहे,तर दुसरीकडे खुलेआम रस्त्यावर ठिकठिकाणी चिकन व मासेमारी या मांस विक्री करणाऱ्या व्यापारी वर्गाचे चांगलेच फावले आहे.नेरळ रेल्वे स्थानक फलाट क्रमांक दोन परिसराच्या बाहेर रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात मासे विक्री करणाऱ्या महिला वर्गानी अर्धा रस्ता अडवून विक्री सुरू केल्याचे चित्र आहे.यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे,नागरिकांना चालायला वाट मिळत नाही.मोक्याचे ठिकाण असल्याने कायम रहदारीचा रस्ता म्हणून येथे नागरिकांची वर्दळ असते,एकीकडे बेशिस्त मोटारसायकल चालकांचे पार्क केलेली दुचाकी,दुसरीकडे मासे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी तर तिसरीकडे रेल्वे प्रवासी वर्गाची गर्दी तर चौथिकडे रिक्षा-टॅक्सी चालकांचा थांबा त्यातूनही  व्यापारी वर्गाची मालवाहू वाहने आणि पर्यटकांची वाहने येथे ये जा करीत असल्याने चारही बाजूने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने येथे रस्त्या अभावी वाहतूक कोंडी होत होती आणि त्यामुळेच येथील राहणाऱ्या रहिवाशी तर नेरळकराना चालण्यात अडचणी निर्माण होवून बसले होते,तर काही ठिकाणी विद्युत महावितरण कंपनीचे रस्त्यात असलेले उभे राहिलेपोल हेही वाहतुकीला अडचण निर्माण करीत असल्याने नागरिक संतापले होते,रोज रोज तीच समस्या त्यातच मांस विक्रीतून परिसरात सुटलेली दुर्गंधी यामुळे नागरिकांना विविध आजारांना देखील सामोरे जावे लागत असल्याने अखेर नेरळच्या ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी,सदस्य जयश्री मांनकामे,गीतांजली देशमुख आणि उमा खडे या महिलां सदस्या रस्त्यावर उतरलेल्या दिसून आल्यात. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेत कर्मचारी आणि नेरळ पोलिसांच्या मदतीने नेरळ रेल्वे स्थानक ते अंबिका भुवन नाका या सदस्यांनी पायी पावसाच्या पाण्यातच भिजत पालथा घातला आणि व्यवसाय करणार्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्यात.

दरम्यान यावेळी सरपंच यांनी काय सूचना दिल्यात त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर

1-रेल्वे स्थानक परिसरातील मासे विक्रीत्यानी रस्ता अडवू नये.
2-मांस विक्री नंतर आणलेल्या मालाचे इतरत्र मांस टाकू नये.त्याची स्वतः विल्हेवाट लावावी.
3-शक्यतो रस्त्याच्या फूटपाथ खाली कोणीही व्यवसाय करणार नाही याची खबरदारी घ्यावी.
4-कोणीही बेशिस्त वाहन पार्क करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणार.
5-व्यापारी वर्गाने आपले कुठलेही बोर्ड किंवा सामान रस्त्यावर ठेवू नये.
6-हात गाड्या धारकांनी एकाच ठिकाणी उभे न राहता फिरून व्यवसाय करावा.जेणेकरून वाहनाला कुठला अडथळा निर्माण होणार नाही.
7-छोटे भाजी विक्रेत्यानी रस्त्यावर मोठ्या प्रमाणत टोपल्या ठेवून रस्ता अडवू नये.
8-दुकानासमोर लावण्यात येत असलेल्या मोटारसायकल चालकास व्यापारी वर्गानेच अडवले पाहिजे.
9-खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचे खरेदी झाल्यावर वाहन ताबडतोब हटवणे गरजेचे आहे.

  नियम न पाळणाऱ्यावर पोलिसांच्या माध्यमातून करवाई केली जाणार असून लवकरच महाराष्ट्र विद्युत महावितरण कार्यलयाच्या माध्यमातून रस्त्यात उभे असलेले पोल देखील हटवले जाणार आहेत असं सांगण्यात आलं.नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करा म्हणून विनंती देखील करण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page