
*रत्नागिरी :* ढाकू… माकूम ढाकु… माकूम, गोविंदा रे गोपाळा, अशा गाण्यांची धुम, हंड्या बांधण्यासाठी आयोजकांची क्रेन, डी. जे., स्टेज आदीच्या तयारीची दुपारपर्यंत लगबग दिसत होती. संध्याकाळी मात्र हंड्या पाहण्यासाठी ठिकठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. गोविंदा पथकांची प्रचंड वर्दळ आणि हड्या फोडण्यासाठी गडबड होती. अखेर रात्री उशिरा राजकीय प्रतिष्ठेच्या हंड्यांसह जिल्ह्यातील २५१ सार्वजनिक, तर २ हजार ६१२ खासगी दहीहंड्या फोडुन दहिकाल्याचाहा हा उत्सव साजरा झाला. यावेळी अनेक गोविंदा पथकांनी लाखेंच्या बक्षिसांची लयलुट केली.
गतवर्षीपेक्षा यावर्षी दहिहंड्यांमध्ये मोठी घट झाली आहे. थरांवर थर लावण्याचा सराव गेले महिनाभर सुरू होता. काही राजकीय नेत्यांनी देखील पॉन्सर केलेले गोविंदा पथके अनेक ठिकाणी दिसत होती. ७ ते ८ थर लागतील एवढ्या उंचीवर हंड्या बांधण्यात आल्या आहेत. यंदा राजकीय कल्लोळ सुरू असल्यामुळे शहर परिसरात विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. रत्नागिरी शहरातील मांडवी किनारी उदय सामंत पुरस्कृत दहीहंडी उत्सव यावषीर् लक्षवेधी ठरला होता. तर मारुती मंदिर येथे उबठा गटाने प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठे स्टेज, हंडी बांधण्यासाठी आणलेल्या क्रेन, डीजे सिस्टीम आदीमुळे दहीकाल्याच्या या उत्सवात मोठी भर पडली. विविध गाण्याच्या तालावर गोविंदा थिरकत पाण्यांचा मारा सहन करीत थरावर थर लावत होते. अनेक गोविंदा पथकांनी सहा ते सात थर लावन सलामी देत बक्षिसांची लयलुट केली. मानाच्या आणि राजकीय प्रतिष्ठेच्या अनेक हंड्या रात्री उशिरापर्यंत फुटल्या नव्हत्या. पावसानेही आज दहीहंडी सणाच्यादिवशी हजेरी लावल्याने गोविंदांच्या आनंदाला भरते आले होते.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*