दोन वर्षात एकदाही Gmail लॉगिन
न केल्यास Google करणार कारवाई

Spread the love

नवी दिल्ली :- अनेक युजर्सचे GMail अकाउंट आहे. काही युजर्स आपले जीमेल खाते सुरू करतात, परंतु त्याकडे वर्षोंवर्षे एकदाही ढुंकून पाहत नाहीत. त्यामुळे ज्या युजर्सनी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जीमेल अकाउंट (Gmail Account) वापरले नसल्यास त्यांच्यावर गुगलकडून कारवाई करण्यात येणार आहे. दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळापसून बंद असलेली आणि वापरात नसलेली Gmail अकाउंटस् गुगलच्या Gmail सिस्टीममधून काढून टाकली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. Google कडून सध्या नवीन धोरणांचा अवलंब केला जात आहे. यानुसार गुगल लवकरच आपली नवीन धोरणे राबवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुगलकडून GMail खात्यासंदर्भात नव्याने पावले उचलली जात आहेत. GMail खातेधारकांनी २४ महिन्यात किमान एकदातरी आपले जुने जीमेल अकाउंट लॉग इन करून ते पुनर्वत करावे, असे आवाहन कंपनीने Gmail युजर्सना केले आहे. यापूर्वी गुगल धोरणांनुसार GMail अकाउंट दोन वर्षे न वापरल्यास खात्यातील संग्रहित डेटा कंपनीकडून काढून टाकला जात होता, मात्र आता कंपनीने कठोर पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. यापुढे GMail खाते युजर्सकडून २४ महिन्यात किमान एकदाही न वापरल्यास हे सिस्टीममधून पूर्णपणे हटवले (Gmail Account) जाणार असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे.
GMail खात्यासंदर्भातील गुगल कंपनीचे हे धोरण यावर्षी तरी लागू होणार नाही. म्हणजेच GMail चे जे खातेधारक या सिस्टीमवर सक्रीय नाहीत, त्यांना अद्याप आपले खाते पुनर्वत करण्यासाठी अद्याप वेळ आहे. कंपनीने अनियमित GMail खाते युजर्संना सध्या सावधतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे शक्य झाल्यास GMail खात्यावर प्रवेश करण्यासाठी कंपनीकडून सांगण्यात आले आहे. २४ महिन्यांत एकदाही GMail अकाउंटवर प्रवेश न केल्यास कंपनीकडून अशा युजर्संची GMail खाती सिस्टीममधून काढून टाकले जातील. यानंतर हटवले गेलेल्या अकाउंटमध्ये (Gmail Account) पुन्हा युजर्सला प्रवेश करता येणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page