संगमेश्वर :-(प्रतिनिधी) संगमेश्वर मधील रामपेठ येथील अंगणवाडी सदिच्छा भेट दिली.सध्या नवरात्र उत्सवाची पर्वणी आरंभ होऊन मंगळवारी तिसऱ्या माळेला संगमेश्वर-देवरुख चे प्रतिष्ठित नागरिक व निरंकारी भक्त गण (११० वेळा रक्तदान) तसेच विविध पुरस्कार प्राप्त अनोखी व्यक्तीमत्व यांनी सापत्नीक श्री निनावी देवी व श्री देव गणपती येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त श्री चे दर्शन घेतले त्यानंतर रामपेठ अंगणवाडी भेट देऊन लहान बालकांशी हितगुज केले. कारभाटले येथील वारकरी भक्तगण व कारभाटले गावचे सरपंच श्री.दिनेश बुधाजी मालप व पत्नी रेश्मा दिनेश मालप यांनी ही दोन्ही मंदिरात श्री. चे दर्शन घेऊन अंगणवाडीत भेट दिली व बालकांचे कौतुक केले.
अंगणवाडी सेविका सौ.पल्लवी सचिन शेरे व मदतनीस सौ.शीतल आंब्रे यांनी गुलाब पुष्प देऊन दोन्ही मान्यवर दाम्पत्यांचे सन्मान केले.सरपंच दिनेश मालप ग्रामपंचायत सदस्य रेश्मा मालप तसेच सेविका पल्लवी शेरे त्यांनी रक्तदाता उदय बंधू कोळवणकर यांच्या मानव सेवा (आरोग्य जीवन) कार्याची प्रशंक्षा केली व मनोगत व्यक्त केले.
यावेळी संगमेश्वर चे प्रतिष्ठित नागरिक श्री अजय आप्पा सुर्वे, सौ.नयनाताई शेट्ये,व्यापारी परवेज मणियार,श्रीमती अंजली रहाटे व पालक वर्ग उपस्थित होते.
यानंतर श्री उदय कोळवणकर यांनी केंद्र शाळा संगमेश्वर येथे भेट दिली यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती. भिडे,सौ चोचे मॅडम व जाधव मॅडम विद्यार्थी वर्ग उपस्थित होता त्यावेळी त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.