
पालघर : महाराष्ट्रात सध्या रस्ते विकासाचे कामे जोमात सुरू आहेत. मोठमोठाली महामार्ग, भुयारी मार्ग, बोगदे, पूल, सागरी मार्ग, उड्डाणपुले यांची कामे प्रगतीपथावर आहेत. या रस्ते विकासाच्या कामामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला निश्चितच चालना मिळत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच इतर स्थानिक प्राधिकरणाच्या माध्यमातून ही कामे केली जात आहेत.
अशातच आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने देखील वसई विरार थेट पालघरची जोडण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे वसई विरार आता थेट पालघरशी जोडले जाणार असून यासाठी दोन नदींवर पूल उभारले जाणार आहेत. खरं पाहता वसई विरार आणि पालघर तालुक्यांमध्ये खाडी असल्याने पालघर जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वसई विरार वासियांना वळसा घालून मुख्यालय गाठावं लागतं.
त्यामुळे त्यांचा बहुमूल्य असा वेळ वाया जातो. अशा परिस्थितीत आता एमएमआरडीएच्या माध्यमातून वसई-विरार पालघरला जोडण्यासाठी नारंगी खाडी आणि वैतरणा नदीवर दोन पूल उभारले जाणार आहेत. वसईला पालघरशी जोडण्यासाठी तीन किलोमीटर लांबीचा पूल नदीवर बांधला जाणार आहे. यासोबतच विरार आणि पालघरला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी पूल उभारला जाणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी एमएमआरडीएला 741 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
यासाठी प्राधिकरणाने सल्ला मागितला असून तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक डीपीआर तयार करण्यासाठी निविदा देखील मागवल्या आहेत. आणि आपणास सांगू इच्छितो की सध्या वसई विरार होऊन पालघर ला जाण्यासाठी अहमदाबाद महामार्गाचा वापर करावा लागतो. दरम्यान आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या या प्रकल्पांतर्गत पालघर- विरार मार्गासाठी विरारकडील नारंगी खाडी जेट्टी ते पलीकडील पालघर तालुक्यातील दातिवरे जेट्टीदरम्यान पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाची लांबी ३.०६ किलोमीटर असेल. दोन्ही बाजूंना मिळून १ किमी अतिरिक्त मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गाची रुंदी ही १२ मीटर राहणार आहे. दरम्यान या होऊ घातलेल्या प्रकल्पामुळे विरार ते पालघर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक तासांचा वेळ वाचणार असल्याचा दावा केला गेला आहे. दरम्यान या प्रकल्पा अंतर्गत दुसरा पूल वैतरणा नदीवर निर्माण केला जाणार आहे.
या होऊ घातलेल्या पुलाबाबत अधिक माहिती अशी की, हा पूल अर्धा किलोमीटर लांब राहणार असून रस्ता ३०० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद राहणार आहे. या दुसऱ्या पुलामुळे वसई ते पालघरला जाणाऱ्या प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. सध्या वसई ते पालघर दरम्यान प्रवास करण्यासाठी मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चा वापर प्रवासी करत आहेत
या मार्गावरून वैतरणा नदी ओलांडल्यानंतर सातिवलीपर्यंत सरळ जाऊन त्यानंतर पुन्हा पश्चिमेकडे पारगाव- सफाळे, केळवेमार्फत राज्य महामार्गाद्वारे पालघर सध्या स्थितीला गाठावे लागत आहे. निश्चितच खूप मोठा वळसा वसई ते पालघर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना घालावा लागत आहे. यामध्ये वाहनचालकांना किमान दीड तासाचा अतिरिक्त फेरा पडत असल्याची माहिती जाणकार देतात.
दरम्यान आता प्रवाशांचा हा वेळ वाचवण्यासाठी हा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. निश्चितच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वसई विरार थेट पालघरची जोडला जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ पैसा वाचणार आहे. तसेच प्रवासादरम्यान होणारी गैरसोय होणार आहे.