शिक्षकांसाठी खुशखबर! राज्यातील २ हजार ३८४ शिक्षक होणार आता केंद्रप्रमुख, कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा सविस्तर..

Spread the love

मुंबई- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ५ जून रोजी जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान यावेळी राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये २ हजार ३८४ केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी ६ जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, महिन्याच्या अखेर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना देखील स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख होण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रप्रमुख हा प्रशासन व शिक्षकांमधील दुवा असतो. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र प्रमुखांच्या अंतर्गत १३ ते १६ शाळा येतात. विशेष म्हणजे केंद्रप्रमुखांची ५० टक्के पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरली जातात. तसेच उर्वरित ५० टक्के पदे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३’ द्वारे भरण्यात येणार आहेत. तर जि.प.शिक्षकांनी पदोन्नतीची संधी मिळाल्यामुळे अनेकांनी तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक शिक्षकांकडून परीक्षेची तयारी देखील केली जात आहे. त्यामुळे आपल्याला देखील केंद्रप्रमुख पद मिळावे अशी अपेक्षा अनेक शिक्षकांची आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये २ हजार ३८४ केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पण या पदासाठी अर्ज करण्यास ५० वर्ष वयाची अट घातल्यामुळे अनेक शिक्षक परीक्षेच्या संधीपासून वंचित राहणार आहेत. तर ५० वर्षावरील शिक्षकांना परीक्षेची संधी मिळावी अशी मागणी पुढे येत आहे. तसेच ती मागणी मान्य न झाल्यास परीक्षेलाच उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काही शिक्षकांनी सुरु केली आहे.

केंद्रप्रमुखासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा?
नाशिक १२२, नंदुरबार ३३, धुळे ४०, जळगाव ८०, अमरावती ६९, बुलढाण ६५, अकोला ४२, वाशिम ३५, यवतमाळ ९०, नागपूर ६८, वर्धा ४३, भंडारा ३०, गोदिया ४२, गडचिरोली ५०, चंद्रपूर ६६, छत्रपती संभाजीनगर ६४, हिंगोली ३४, परभणी ४३, जालना ५३, बीड ७८, लातूर ५०, धाराशिव ४०, नांदेड ८७, ठाणे ४७, रायगड ११४, पालघर ७५, पुणे १५३, अहमदनगर १२३, सोलापूर ९९, कोल्हापूर ८५, सांगली ६७, सातारा १११, रत्नागिरी १२५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६१ जागांवर केंद्रप्रमुख भरले जाणार आहे.

ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार
केंद्रप्रमुख होण्यासाठी ऑनलाईन परीक्षा शिक्षकांना द्यावी लागणार आहे. २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. तर या २०० गुणांमध्ये दोन विभाग असून, पहिल्या विभागात बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता हा घटक असेल. दुसऱ्या विभागात शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह याविषयीचा अभ्यासक्रम असणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page