ठाणे : मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) यादरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता एसी बसचा (AC Bus) गारेगार प्रवास आणखी स्वस्त झाला आहे. ठाणे महानगर परिवहन (TMT – Thane Municipal Transport) मंडळाने एसी बसच्या तिकीटाच्या दरात कपात केला आहे.
टीएमटीने (Thane Municipal Transport) बस तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे एसी बसचं भाडं फक्त 65 रुपये असणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर नव्याने समाविष्ट केलेल्या इलेक्ट्रिक एसी बसेस (Electric AC Bus) आणि व्होल्वो दोन्ही सेवांवर नवीन भाडे दर लागू करण्यात येईल. बेस्ट (BEST) आणि नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) बस सेवांमधील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
टीएमटी (TMT) बस मार्गावरील प्रवासी BEST आणि NMMT च्या स्वस्त पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. यामुळे स्वस्त पर्यायांकडे वळणाऱ्या प्रवाशांना शांत, आरामदायी आणि परवडणारा प्रवास देण्यासाठी टीएमटीने हा निर्णय घेतला आहे.
सुधारित दरांनुसार, टीएमटी एसी बसचे किमान भाडे आता पहिल्या दोन किलोमीटरसाठी 20 रुपयांऐवजी 10 रुपये असेल म्हणजे यामध्ये 50 टक्के घट करण्यात आली आहे. तर कमाल भाडे 105 रुपयांवरून 105 रुपयांपर्यंत कमी करून 65 रुपये करण्यात आलं असून यामध्ये 40 टक्के कपात करण्यात आली आहे.
टीएमटीने लागून केलेल्या नव्या दरांमुळे प्रवाशांचा मुंबई ते ठाणे असा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. प्रवाशांना मुंबई ते ठाणे एसी बसच्या प्रवासासाठी 105 रुपये नाही तर फक्त 65 रुपये भाडं द्यावं लागेल. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आराम मिळणार आहे. शिवाय आता उन्हाळा जवळ आल्याने प्रवाशांना उन्हाच्या उकाड्यापासून वाचून एसी बसची गारेगार हवा खात स्वस्तात प्रवास करता येईल.