मुंबई (प्रसाद महाडीक/शांताराम गुडेकर )
ग्लोबल सनशाईन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सूरज माटे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एका पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं होतं.जनमानसात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून प्रसिध्द असलेले आणि नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे ग्लोबल सनशाईन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सूरज माटे यांनी या भव्य दिव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे शानदार आयोजन केलं.या कार्यक्रमात ग्लोबल सनशाईन कंपनीच्या नफ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातील महिलांना सुवर्णनाणी तसेच पैठणी साड्या आणि विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयफोन बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पल्लवी वैद्य, मेघा घाडगे, प्रतिभा शिंपी, चारुल मलिक, उर्मिला वर्मा, अंजली शर्मा, कल्याणजी जाना, नितीन तायडे आदी सुप्रसिद्ध कलाकार यावेळी उपस्थित होते. समाजसेविका सलमा मेमन यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व पाहुण्यांनी ग्लोबल सनशाईनच्या उपक्रमाचं कौतुक केलं. सूरज माटे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केलं. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध RJ आणि सुप्रसिद्ध निवेदिका मधुरा प्रभू यांनी केलं.